विना मास्क फिरणाऱ्यांसह, थुंकणाऱ्यांविरोधात BMC आक्रमक; 5 लाख जणांवर कारवाईचे लक्ष्य

समीर सुर्वे
Wednesday, 4 November 2020

या महिन्यात पाच लाख जणांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यात मास्क न वापरणाऱ्यांबरोबरच सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे आणि कचरा टाकणाऱ्यांविरोधात ही मोहीम राबवण्यात येणार आहे. 

मुंबई : ऑक्‍टोबर महिन्यात मास्क न वापरणाऱ्या रोज 20 हजार जणांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांनी दिले होते; मात्र आता या महिन्यात पाच लाख जणांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यात मास्क न वापरणाऱ्यांबरोबरच सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे आणि कचरा टाकणाऱ्यांविरोधात ही मोहीम राबवण्यात येणार आहे. 

अनलॉक सुरू होताच सोनसाखळी चोरही सक्रिय; मुंबईत एका दिवसात 8 घटना उघडकीस

कोव्हिडच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे; मात्र आजही नागरिक मास्क न वापरता सार्वजनिक ठिकाणी वावरत आहेत. महापालिका एप्रिल महिन्यापासून अशा नागरिकांवर कारवाई करत असून आतापर्यंत एक लाख 60 हजार जणांवर कारवाई करण्यात आली असून तीन कोटी 49 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ऑक्‍टोबर महिन्यात आयुक्तांनी पालिकेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मास्क न वापरणाऱ्या रोज 20 हजार जणांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते; मात्र प्रत्यक्षात आठ ते नऊ हजार जणांवर कारवाई होत होती.

विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महाविकास आघाडीची सावध पावलं; दोन पर्यायांवर विचार सुरू

आयुक्तांनी नोव्हेंबर महिन्यासाठी नवे लक्ष्य दिले आहे. या महिन्यात पाच लाख जणांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये मास्क न वापरणाऱ्यांसह रस्त्यावर थुंकणारे आणि कचरा टाकणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

BMC action against spitting including walking without a mask

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC action against spitting including walking without a mask

टॉपिकस