
BMC Budget : अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी भक्कम तरतूद; मुंबईत बनणार हजारो कोटींचे रस्ते
मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा यंदाचा २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प ५२६१९.९ कोटी रुपयांचा आहे. गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प ४५९४९.२१ कोटी रुपयांचा होता. म्हणजेच यावर्षी १४.५२ टक्के वाढ झाली आहे.
या अर्थसंकल्पात रस्ते आणि बांधकामांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. कोस्टल रोडसाठी ३ हजार ५४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोरेगाव मुलुंड जोडरस्त्यासाठी १ हजार ६० कोटी रुपये देण्यात आले आहेत. हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी
रस्त्यांच्या सुधारणेसाठी २८२५.६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पुलांच्या कामांसाठी २ हजार १०० कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे.
पर्जन्यजल वाहिन्यांसाठी २५७०.६५ कोटी रुपये, सार्वजनिक आरोग्यासाठी १६८०.१९ कोटी रुपये, शिक्षण विभागासाठी ३३४७.१३ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
रुग्णालयांच्या बांधकाम आणि पुनर्विकासासाठीही अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी ₹ ११० कोटी, गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयाच्या बांधकामासाठी ₹ ११० कोटी, एम. टी. अगरवाल रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी ₹ ९५ कोटी देण्यात आले आहेत.
कांदिवली (प) येथील शताब्दी रुग्णालयाच्या प्रस्तावित बांधकामासाठी ₹ ७५ कोटी, सायन रुग्णालय इमारतीच्या पुनर्विकासासाठी ₹ ७० कोटी, एस विभाग, भांडूप येथील प्रस्तावित मल्टी स्पेशालिटी महानगरपालिका रुग्णालयासाठी ₹६० कोटी, वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालयाचे विस्तारीकरण ₹५३.६० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.