ठाकरेंच्या अडचणी वाढणार? मुंबई पालिकेतील भ्रष्टाचाराची होणार चौकशी : BMC CAG Report | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav Thackeray

BMC CAG Report: ठाकरेंच्या अडचणी वाढणार? मुंबई पालिकेतील भ्रष्टाचाराची होणार चौकशी

मुंबई महापालिकेतील कथीत भ्रष्टाचार प्रकरणी उद्धव ठाकरे यांची चौकशी होऊ शकते. कारण मुंबई महापालिकेतील व्यवहारांचा कॅगचा अहवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेत मांडला. त्यामुळं ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

कॅगचा अहवाल फडणवीसांनी विधानसभेत मांडला. तसेच यावेळी त्यांनी योग्य यंत्रणांमार्फत या प्रकरणी चौकशीचा निर्णय घेऊ अशी घोषणाही त्यांनी केली. त्यामुळं मुंबई महापालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर चौकशीची टांगती तलवार आहे. भ्रष्टाचारप्रकरणी चौकशीबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून योग्य यंत्रणांमार्फत चौकशीचा निर्णय करू, असं फडणवीस यावेळी म्हणाले.