esakal | राजकीय आरोप झेलत BMC आयुक्त चहल यांची वर्षपुर्ती
sakal

बोलून बातमी शोधा

BMC-Chahal

राजकीय आरोप झेलत BMC आयुक्त चहल यांची वर्षपुर्ती

sakal_logo
By
समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोविडची पहिली लाट शिगेला पोहचलेली असताना महानगर पालिका आयुक्तपदी (BMC Commissioner)गेल्या वर्षी 8 मे रोजी इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची नियुक्ती झाली. ही नियुक्ती झाली त्याच दिवशी संध्याकाळ पासून कोविड विरोधातील लढा (covid fight) सुरु केला. या वर्षभरात त्यांनी अनेक राजकीय आरोप झेलत काम सुरु ठेवले. काही दिवसांपुर्वी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई मॉडलचे कौतुक करत या मॉडलचा अभ्यास करण्याचे निर्देश केंद्र आणि राज्य सरकारला दिले. (BMC Commissioner Iqbal Singh Chahal completed one year)

कोविड मुंबईच्या गळ्यापर्यंत आलेला असताना चहल यांनी आयुक्त पदाची जबाबदारी स्विकारली. ज्या दिवशी त्यांची नियुक्ती झाली, त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली. दुसऱ्या दिवशी ते तडक महत्वाच्या रुग्णालयांच्या पहाणीसाठी पोहचले. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात जाऊन त्यांनी कोविड बाधितांची विचारपूस केली. धारावीत जाऊन तेथील पाहाणी करुन आढावा घेतला. आढावा भेटीगाठींचा सिलसिला पूर्ण झाल्यानंतर त्यांनी धडाधड निर्णय घेण्यास सुरवात केले.

हेही वाचा: मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी

जम्बो कोविड केंद्र उभारण्यापासून अनेक महत्वपूर्ण निर्णय या काळात झाले. त्यावर आरोपही झाले. पण,आयुक्तांनी त्यांचे काम सुरु ठेवले. धारावी मॉडल पासून झालेली सुरुवात आज मुंबई मॉडल देशात नावाजला जात आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याची दखल घेऊन आयुक्त चहल यांच्या नावाचा उल्लेखही केला. मात्र,हे यश सर्वांचेंच आहे अशा शब्दात यशाचे श्रेय आयुक्त सर्वांना देतात.