महापालिकेचा नगरसेवकांच्या चमकोगिरीला नकार, फलकांसाठी जागा नाही

BMC
BMCsakal media
Updated on

मुंबई : महानगरपालिका (bmc) प्रशासनाने नगरसेवकांना (corporator) चमकोगीरी करण्यास नकार दिला आहे. नगरसेवक निधीतून (fund) होणाऱ्या प्रकल्पांची (project) माहिती देण्यासाठी फलक लावण्यासाठी (board) जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी प्रशासनाने फेटाळली आहे. (bmc-corporator-fund-project-board-nss91)

नगरसेवक आपल्या प्रभागात करत असलेल्या कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहचू शकत नाही.ही माहिती प्रदुर्शित करायला मतदार संघात जागा उपलब्ध नसते.त्यामुळे विभागात झालेली कामे,वापरलेला निधी,तसेच सार्वजनिक नोटीस प्रदर्शित करण्यासाठी मतदार संघात जागा निश्‍चित करुन द्यावी असा ठराव महासभेने 2007 मध्ये केला होता.कॉंग्रेसचे तत्कालीन सदस्य विनोद शेखर यांनी ही ठरावाची सुचना मांडली होती.

BMC
...अन्यथा दरमहा 15 हजार रुपये भत्ता द्या, रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी

यावर प्रशासनाने या महिन्यात होणाऱ्या महासभेच्या कामकाजात अहवाल सादर केला आहे.संबंधीत कामाचा तपशील त्या त्या कार्यस्थळी फलक,स्तंभ स्वरुपात प्रदर्शित करत असतात.तसेच,पालिकेच्या संकेतस्थळावरही प्रभागनिहाय केलेल्या कामाची माहिती प्रदर्शित केली जाते.त्यामुळे मतदार संघात कलेल्या कामाचा तपशिल प्रदर्शित करण्यासाठी विशिष्ठ जागा उपलब्ध करुन देणे उचित होणार नाही.असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

14 वर्षांनी दिले उत्तर

हा ठराव महासभेत 26 जून 2007 मध्ये मंजूर केला होता.त्यावर प्रशासनाने आता उत्तर दिले आहे.पालिकेच्या लेट लतिफ कामाचा अनुभव फक्त सामान्य नागरीकांनाच नाही तर अशा प्रकारातून नगरसेवकांनाही येत असल्याचे स्पष्ट झाले.असा प्रकार पहिल्यांदाच घडत नसून यापुर्वीही अनेक वेळा घडलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com