'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा'

पूजा विचारे
Tuesday, 5 January 2021

मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा मुंबईतल्या गुजराती बांधवांना साद घातली आहे.

मुंबईः  पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहेत. त्यात सत्ताधारी शिवसेनेनंही पालिकेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. शिवसेनेनं मुंबईसह राज्यातील गुजरात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचं दिसलंय. मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा मुंबईतल्या गुजराती बांधवांना साद घातली आहे.

शिवसेनेनं १० मनपा निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेनेची गुजराती लोकांना जागृत करण्याची आगळी वेगळी मोहीम राबवणार आहे. त्यासाठी शिवसेना गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करणार आहे.  मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा या मथळ्याखाली हा मेळावा होणार आहे. 

 

भाजपच्या पारंपारिक गुजराती मतदाराला स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी गुजराती बांधवांसाठी सेनेच्या वतीने येत्या १० तारखेला जोगेश्वरीत मेळावा होतोय. या मेळाव्यात १०० गुजराती बांधव शिवसेनेत प्रवेश करतील अशी प्राथमिक माहितीही समोर आली आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांना सेनेकडे वळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मेळाव्यासाठी गुजराती आणि मराठी भाषेत निमंत्रण पत्रक देखील छापण्यात आली आहेत.

वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंचं केम छो वरळी 

आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढले होते. त्यावेळी त्यांनी लावलेल्या बॅनर्सची चर्चा चांगली रंगली होती. वरळीतून आदित्य यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेकडून केम छो वरळी असे गुजराती भाषेतले पोस्टर्स लावण्यात आले होते.

bmc election 2022 Shivsena gujarati card mumbai ma jalebi na fafda uddhav thackeray apda


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bmc election 2022 Shivsena gujarati card mumbai ma jalebi na fafda uddhav thackeray apda