esakal | महापालिका निवडणुकांवर कोविडचे सावट; मनुष्यबळ नियोजनाचे आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

महापालिका निवडणुकांवर कोविडचे सावट; मनुष्यबळ नियोजनाचे आव्हान

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : महानगरपालिकेच्या (bmc) फेबृवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकांवर (elections) कोविडचे सावट (corona) आहे. त्यामुळे मनुष्यबळाचे (manpower) नियोजन करण्याचे आव्हान महानगरपालिकेवर आले आहे. कोविडची तीसरी लाट (corona third wave) येण्याची शक्यता असल्याने निवडणुक पुर्व कामांसाठी कशा प्रकार मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे असा पेच प्रशासनापुढे उभा राहीला आहे. निवडणुक आयाेगाने (election commission) महानगर पालिकेने मुंबईतील तयारीसाठी मनुष्यबळाची मागणी केली आहे. तर, तत्काळ मनुष्यबळ न पुरवता पुढील काही दिवस प्रतिक्षा करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.

हेही वाचा: मुंबईत सक्रिय रुग्णांचा आलेख चढाच!

मुंबईत 95 ते 96 लाखाच्या आसपास मतदार असून प्रभागांचे नव्याने सिमांकन करण्या बरोबर मतदार यादी अंतिम करण्या पासून सर्व पर्व तयारी करावी लागणार आहे.याबाबत काही दिवसांपुर्वी महानगर पालिका प्रशासनाची आढावा बैठक झाली.या बैठकीत मनुष्यबळ नियोजनाचा मुद्दा उपस्थीत झाला आहे.कोविडची तीसरी लाट आल्यास त्यासाठी अतिरीक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे लागेल.मग,निवडणुकीच्या पुर्व तयारीचे काम कसे होणार आहे.असा प्रश्‍न प्रशासनाला पडला आहे.

निवडणुक आयोगाने महानगर पालिकेने मनुष्यबळाची मागणी केली आहे.मात्र,कोविडची तीसरी लाट येण्याची धोका आहे.अशा वेळी पालिकेतील कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले असल्यास कोविडचे नियोजन कसे होणार असा पेच आहे.त्यामुळे तत्काळ मनुष्यबळ कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष मतदानांच्या वेळी बुथची संख्याही वाढणार आहे.गेल्या निवडणुकीत साधारण आठ हजाराच्या आसपास बुथ होते ही संख्या 11 हजारांपर्यंत वाढणार आहे.त्याच संख्येने मोजणी केंद्रही वाढण्याची शक्यता आहे.असे पालिकेकडून सांगण्यात आले.त्यामुळे यासाठीही वाढीव मनुष्यबळही वाढणार आहे.त्यामुळे या वाढीव मनुष्यबळाचे नियोजन कसे करावे असाही प्रश्‍न आहे.

हेही वाचा: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच

महापालिकेची अडचण काय?

कोविडची तीसरी लाट ऑक्टोबर महिन्यात येण्याची शक्यता.

दुसऱ्या बाजूला निवडणुकीची पुर्व तयारी सुरु करणे आवश्‍यक.

प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी पुर्वी 50 हजार कर्मचारी लागायचे ते आता 70 हजारा पर्यंत लागणार.

पूर्व तयारी कशी ?

-प्रभागांचे सिमांकन करणे,बुथचे नियोजन तयार करणे.

-वाढीव बुथसाठी जागा निश्‍चित करणे.

- मतदान वाढविण्यासाठी जनजागृती करणे.

loading image
go to top