esakal | ज्येष्ठ नागरिकांमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेनं राबवली 'ही' जबरदस्त उपाययोजना
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ नागरिकांमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेनं राबवली 'ही' जबरदस्त उपाययोजना

मुंबई पालिकेनं कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. पालिकेनं एप्रिलपासूनच ज्येष्ठ नागरिकांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. या वयोगटातील नागरिकांना या व्हायसरचा अधिक धोका आहे.

ज्येष्ठ नागरिकांमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेनं राबवली 'ही' जबरदस्त उपाययोजना

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जाताहेत. मुंबई पालिकेनं कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. पालिकेनं एप्रिलपासूनच ज्येष्ठ नागरिकांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. या वयोगटातील नागरिकांना या व्हायसरचा अधिक धोका आहे. तेव्हा पालिकेनं शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या ऑक्सिजनची पातळी तपासण्यास सुरुवात केली होती, जे ते कार्य अद्यापही सुरु आहे. आतापर्यंत, पालिकेनं 6,74,053 ज्येष्ठ नागरिकांच्या ऑक्सिजनची पातळी तपासली आहे. यापैकी 6,71,312 लोकांमध्ये ऑक्सिजनची पातळी सामान्य किंवा जास्त आहे. केवळ 2,471 जणांची 95 च्या खाली ऑक्सिजनची पातळी होती.

प्रत्येक विभागात टीम तैनात 

पालिकेनं ऑक्सिजनची पातळी कमी असलेल्यांकडे विशेष लक्ष दिलं. आवश्यक असल्यास त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये सुद्धा पाठवण्यात आलं. लक्षणे दिसण्यापूर्वीच त्यांना वेगळे केले जात आहेत, म्हणून उपचारादरम्यान जास्त समस्या उद्भवत नाहीत. ऑक्सिजनची पातळी कमी असलेल्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी बीएमसीने प्रत्येक प्रभागात एक देखरेख टीम स्थापन केली असल्याची माहिती  प्रमुख बीएमसी रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी दिली. 

हेही वाचाः  तीन महिन्यांपासून बिनपगारी ऑन ड्युटी असलेल्या 'त्या' १४४ नर्संसाठी आनंदाची बातमी

अतिरिक्त नगरपालिका आयुक्त सुरेश काकणी यांनी सांगितलं की,  ज्येष्ठ नागरिकांच्या ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी बीएमसीचे पथक घरोघरी गेले, ज्यामुळे ऑक्सिजनची पातळी 95 च्या खाली गेली आहे अशा लोकांना शोधणे आणि त्यांच्यावरील उपचार करणे सोपं झालं होतं.  याद्वारे आम्ही ज्येष्ठ नागरिकांमध्ये कोविड-१९ व्हायरसचा प्रसार यशस्वीपणे रोखू शकलो. 

ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिक्रिया 

लोअर परळ येथे राहणारे बाबाजी शिंदे (वय 65) यांची पालिकेकडून तपासणी केली गेली. त्यानंतर ते म्हणाले की, पालिकेचे कर्मचारी माझ्या इमारतीत आले आणि त्यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या ऑक्सिजनची पातळी तपासली.

अधिक वाचाः आम्हाला एप्रिल महिन्यापासून पगार मिळालेला नाही, विशेष शाळेतल्या कर्मचाऱ्यांची व्यथा

61 वर्षीय कुसुम सिंग म्हणाल्या, संपूर्ण लॉकडाऊन दरम्यान मी घराबाहेर पडले नाही. मी पालिकेच्या कर्मचार्‍यांना हे सांगितले, तरीही त्यांनी खबरदारीच्या दृष्टीने माझी ऑक्सिजन पातळी तपासली.

BMC Focus Senior Citizens checking oxygen levels every ward

loading image