मुंबई महापालिकेतील भाजपाचे नगरसेवक फुटणार?

शिवसेना नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
BJP and Shivsena
BJP and ShivsenaSakal

मुंबई: पुढच्यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC Election) होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने (Bjp) आधीपासूनच तयारी सुरु केली आहे. काहीही करुन पुढच्या महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्याचे लक्ष्य भाजपाने ठेवले आहे. सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेपाठोपाठ (shivsena) भाजपाच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे. राज्यातील सत्तेपासून वंचित ठेवणाऱ्या शिवसेनेला काहीही करुन महापालिका निवडणुकीत धडा शिकवण्याचा चंग भाजपाने बांधला आहे. त्यासाठी भाजपा जोरदार तयारी करत आहे.

दरम्यान पालिका निवडणुकीसाठी भाजपाकडून मोर्चेबांधणी सुरु असताना, शिवसेना नेते आणि नगरसेवक यशवंत जाधव यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. लवकरच भाजपचे १५ ते २० नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. मुंबईतील भाजप नगरसेवक पक्षात नाराज असल्याचे त्यांनी सांगितले.

पालिकेतील भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या मनमानी कारभाराला कंटाळून हे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट यशवंत जाधव यांनी केला आहे. डिसेंबर मध्ये धमाका होणार असून, आम्ही सुद्धा ऑपरेशन करणार आहोत असे त्यांनी सांगितले.

BJP and Shivsena
नवऱ्याची पत्नीवर अनैसर्गिक सेक्ससाठी जबरदस्ती, महिलेची पोलिसात तक्रार

"भाजपाने किती मराठी उमेदवारांना उमेदवारी दिली आहे किंवा किती मराठींना उमेदवारी देणार आहेत? आता दिलेल्या आकडेवारीवरुन तुमच्या लक्षात येईल, त्यांचे किती नगरसेवक मराठी आहेत आणि किती नगरसेवकांना त्यांनी मराठी बोलायला शिकवलं आहे" अशी टीका यशवंत जाधव यांनी केली.

BJP and Shivsena
NSG कडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी, IAF बेसवर कमांडोज तैनात

भाजपाचा पलटवार

यशवंत जाधव यांच्या दाव्यावर बोलताना भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी जाधव यांचा बार फुसका निघेल, असे म्हटले आहे. स्वप्न रंजन करायला हरकत नाही. भाजपचा एकही नगरसेवक फुटणार नाही. त्यांची काय तयारी झाली ते मला माहीत नाही, धमाका नाही फुसका बार निघेल असा दावा प्रभाकर शिंदे यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com