BMC : मुंबईकरांना मिळणार घराजवळच उपचार; यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद

BMC
BMCsakal media

मुंबई : कोरोना (corona) आणि ओमिक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे (omicron infection) मुंबई महापालिकेने (bmc) यंदा अर्थसंकल्पात (union budget) आरोग्य क्षेत्रासाठी (health department) भरीव तरतूद केली आहे. अर्थसंकल्पात दवाखान्यांच्या संख्येत वाढ, मोठ्या रुग्णालयांचा विस्तार करण्यासोबतच प्राथमिक उपचारांसाठी (first aid) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शिव आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून मुंबईकरांना घराजवळच प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध होईल.

BMC
नवी मुंबई : पायाभूत सुविधांसाठी भरीव आर्थिक तरतूद

पहिल्या टप्प्यात शहरात एकूण १०० शिव आरोग्य आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात येईल. या केंद्रात डॉक्टर्स, औषधालय, परिचारिका कक्ष, रुग्ण तपासणी कक्ष तसेच प्रतीक्षालय, आदींचा समावेश आहे. १३९ विविध प्रकारच्या चाचण्या या केंद्रात केल्या जाणार आहेत. क्ष-किरण चाचणी, सी.टी. स्कॅन, मॅमोग्राफी इत्यादी चिकित्सा नाममात्र शुल्कावर उपलब्ध करुन देण्यात येतील. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून विविध चिकित्सा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी खासगी संस्थांचा सहभाग घेण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त १०० आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात येईल. या उपक्रमासाठी २०२२ आर्थिक वर्षात भांडवली खर्चासाठी एकूण २५० कोटी व महसूली खर्चासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

दवाखाने व प्रसूतीगृहांचा दर्जा सुधारणार

२०२२-२३ मधील मुंबईतील दवाखान्यांचा दर्जा सुधारण्यासाठी २५७.५० कोटी, १३ दवाखान्यांच्या मानकीकरणासाठी ११ कोटी, तसेच प्रसुतीगृहांचा दर्जा सुधारण्यासाठी ३५.३८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

कर्करोगावर अद्ययावत उपचार प्रोटॉन थेरपी

मुंबईकरांना जलद उपचार आणि अद्ययावत उपचार प्रणाली मिळण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने कर्करोगावरील उपचारासाठी प्रोटॉन थेरपी सुविधा टाटा रुग्णालयाच्या सहकार्याने उभारण्यात येणार आहे.

BMC
मुंबई महापालिकेला मृत्यूदर रोखण्यात यश

अभ्यासक्रमाच्या जागा वाढणार

मुंबई महापालिकेने नुकतेच पोस्ट-डॉक्टरल फेलोशिप्स हे अभ्यासक्रम सुरू केले. तसेच २०२१ मध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील पदवी अभ्यासाक्रमाच्या जागा ५५० वरून ८००, तर पदव्युत्तरच्या जागा ५४५ वरून ६८३ तर अतिविशेषकृत विभागांच्या जागा ९७ वरून ११४ पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत.

नव्याने सुरू होणारे प्रकल्प
- नायर रुग्णालयातील ऑन्कोलॉजी विभाग
- भांडुप येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालय
- डॉ. आंबेडकर रुग्णालय कांदिवली येथील सुपर स्पेशालिटी विभाग, शवविच्छेदन केंद्र, तसेच कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान

रुग्णालयांचा पुनर्विकास

- सिध्दार्थ रुग्णालय
- लो. टि.म.स. रुग्णालय
- क्रांतिवीर महात्मा ज्योतिक फुले रुग्णालय
- ओशिवरा प्रसुतीगृह
- राजावाडी रुग्णालय
- कामाठीपुरा येथील नेत्र रुग्णालय
- कूपर रुग्णालयातील इमारतीचे नवीन बांधकाम

विशेष मुलांसाठी पुनर्वसन केंद्र

लहान मुलांना एकाच छताखाली उपचार मिळावेत यासाठी भायखळ्यात पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या ठिकाणी मुलांच्या समुपदेशनापासून ते उपचारांपर्यंत सर्व गोष्टींवर भर दिला जाईल. त्यासाठी १४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com