
Lockdown in Mumbai| मुंबईत लवकरच लॉकडाऊन? पालिका आयुक्तांची माहिती
राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने महाराष्ट्रात कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीला मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने दैनंदिन जीवनमानावर त्याचा थेट परिणाम होत आहे. (Corona Restrictions in Mumbai)
यातच मुंबईत ओमिक्रॉन रुग्णांचाही आकडा वाढला आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालिकेचे आयुक्त इकबालसिंग चहल यांनी महत्वाची माहिती दिली आहे. (Mumbai Lockdown)
मुंबईत मागील चोवीस तासात 7 हजार 928 रुग्ण आढळले होते. सध्या देशातील सर्वात जास्त रुग्णवाढीचा दर मुंबईत आहे. तर आठवडाभरात यात झपाट्याने वाढही झाली आहे. मागील सात दिवसांत सात पटींने रुग्ण वाढल्याने मुंबईत चिंतेचं वातावरण आहे.
पालकमंत्री अस्लम शेख आणि महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor) यांच्यात बैठक होण्याची शक्यता वाढली आहे. यादरम्यान पालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल (Iqbal Singh Chahal) यांनी एका इंगज्री वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुंबईत दररोज 20 हजार रुग्ण आढळल्यास लॉकडाऊन लावावं लागेल, असं म्हटलंय.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. राज्यात एकूण सापडलेल्या ओमिक्रॉन रुग्णांमध्येही सर्वाधिक मुंबईतील आहेत. या पार्श्वभूमिवर मुंबईतील शाळा पुन्हा ऑनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग यापुढे ऑनलाईन पद्धतीने भरणार आहेत. फक्त आणि 10 वा आणि 12 वीचे वर्ग सुरू असतील.
Web Title: Bmc Likely To Impose Mini Lockdown In Mmrda Region Bmc Commissioner Iqbal Singh Chahal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..