
मुंबई - वैद्यकिय कर्मचारी रुग्णालयात कोरोनाशी मुकाबला करत आहेत. तर सफाई कामगार रस्त्यावर उतरुन शहर स्वच्छ करत आहेत. पण, कोरोनाच्या महाभयंकर साथीतही कंत्राटी सफाई कामगारांच्या जिवीशी खेळ सुरु आहे. या कामगारांना अद्याप ग्लोज पुरविण्यात आलेली नाहीत. तर मास्कही हे कामगार महिन्या भरा पासून वापरत आहेत. कोरोनाच काय महापुरानंतरही मुंबईतील सफाई कामगारांनी महत्वाची भुमिका बजावली आहे. पण, नेहमीच या कामगारांच्या जिवाशी खेळ सुरु असतो. आताही परीस्थीती बदलली नाही.
मुंबई स्वच्छ ठेवण्यात सफाई कामगारांचे महत्वाचे योगदान आहे. कंत्राटीतील अटीनुसार या कामगारांना नियमीत पणे हॅण्डग्लोज, मास्क, गमबुट, साबण पुरवणे गरजेचे आहे. तसेच कामाच्या ठिकाणी वैयक्तिक स्वच्छतेसाठी पाणी पुरवणे गरजेचे आहे. पण, ते आताही पुरवले जात नाहीत.
महिनाभरापूर्वी आम्हाला मास्क देण्यात आले. तर ग्लोज अद्याप देण्यात आलेले नाही. महिन्याभरापासून हे कापडी मास्क रोज वापरत आहोत. आता त्यांनाही कचर्याचा वास येऊ लागल्याने सतत तोंडाला बांधून ठेवणे शक्य नाही. अशी नाराजी सफाई कामगार व्यक्त करतात. साबणही महिन्याभरापूर्वी दिला होता. तो आठवड्या भरात संपला. असेही सांगण्यात आले. अपुऱ्या सुविधामुळे सफाई कामगारांमध्ये प्रामुख्याने श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात आढळतात.
मुंबईत साधारण 6 हजार कंत्राटी कामगार आहेत. अनेकांना अद्याप आवश्यक सुविधा मिळालेल्या नाहीत. काही ठिकाणीी सर्जिकल ग्लोज देण्यात आले होते. ते थोड्याच वेळात फाटले. तर काही ठिकाणी औद्योगिक ग्लोज दिले. ते वापरुन काम करणे शक्य नाही. कामाच्या आवश्यकते नुसार सुविधा पुरवणे गरजेचे आहे असं कामगार नेते मिलींद रानडे म्हणालेत.
कंत्राटदारांनी कामगारांना आवश्यक ती सुविधा पुरविणे गरजेचे आहे. कामगारांना आवश्यक ती साधनं पुरवली जात आहेत का नाही याची खात्री करुन घेण्यास पर्यवेक्षकांना सांगण्यात आले आहे. त्यानुसार काम सुरु असल्याचं मुंबईचे महापालिका उपयुक्त अशोक खैरे म्हणालेत.
BMC is not taking good care of cleaning workiers of mumbai says safai karmachari
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.