कोरोना रुग्णांना कुटुंबियांशी कनेक्टेड ठेवण्यासाठी मुंबई महापालिका ६०० टॅब्स विकत घेण्याच्या विचारात

कोरोना रुग्णांना कुटुंबियांशी कनेक्टेड ठेवण्यासाठी मुंबई महापालिका ६०० टॅब्स विकत घेण्याच्या विचारात

मुंबई : कोरोनाचा कहर अद्याप संपलेला नाही. मात्र मुबईसारख्या अत्यंत दाटीवाटीच्या आणि लोकसंख्येची उच्च घनता असणाऱ्या शहरात कोरोनाचा कहर नियंत्रणात आहे असं म्हंटल तर वावगं ठरू नये. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी अनेक पावलं उचलली गेलेत अजूनही नवनवीन पावलं उचलली जातायत. याचाच एक भाग म्हणून मुंबई महानगर पालिकेने कोरोनाबाधित रुग्णांना आपल्या कुटुंबाशी संपर्क करता यावा, संवाद साधता यावा यासाठी कोरोना उपचार केंद्रांमध्ये टॅब्स उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय.

मुंबईतील महापालिकेचे मोठे कोविड सेंटर्स तसेच उपचार केंद्रांमध्ये हे टॅब देण्यात येणार असल्याचं समजतंय. बृहन्मुंबई महानगरपालिका यासाठी तब्बल सहाशे टॅब्स खरेदी करणार असल्याचं समजतंय. कोविड केअर सेंटरमध्ये असे अनेक रुग्ण येतात ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत. अशात या रुग्णांना एकटेपणा जाणवू नये, त्यांना आपल्या कुटुंबाच्या संपर्कात राहता यावं, त्यांना घरच्यांशी व्हिडीओ द्वारा संवाद साधता यावा यासाठी हा अनोखा प्रयोग करण्याचं मुंबई महापालिकेने ठरवलं असल्याचं समजतंय.   

दरम्यान, कोरोना काळातच नाही तर पुढेही हा प्रयोग सुरु ठेवावा, जेणेकरून येत्या काळात रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी हजेरी न लावताही त्यांना थेट रुग्णाशी आणि रुग्णांना घरच्यांशी संपर्क साधता येऊ शकतो असं मनपा अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी म्हणालेत.  

BMC plans to buy 600 tabs for covid patients for the purpose of keeping in touch with family

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com