कोरोना लस ठेवण्यासाठी मुंबई पालिकेची पूर्व तयारी, पालिका रुग्णालयात करणार जागा

कोरोना लस ठेवण्यासाठी मुंबई पालिकेची पूर्व तयारी, पालिका रुग्णालयात करणार जागा

मुंबईः  कोरोनावरील लस लवकरच येण्याची शक्यता असल्याने मुंबई पालिकेने त्याबाबतची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मुंबईच्या पालिका रुग्णालयातील रक्त पेढी, दुग्ध पेढी, त्वचापेढीत लस ठेवण्यासाठी जागा करण्यात येणार आहे. 

किमान 40 हजार कूप्या राहतील अशी सुविधा पालिका रुग्णालयात केली जाणार आहे. ज्या ज्या रुग्णालयात लस ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज उपलब्ध आहे अशा सर्व रुग्णालयांना पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी पत्र लिहून याबबातची कल्पना दिली आहे. त्यानुसार, प्रमुख रुग्णालयातील कोल्ड स्टोरेजची माहिती मागितली आहे.

‌अद्याप कोव्हिडची लस आली नसली तरी मुंबई महानगरपालिकेने तयारी करण्यास सुरुवात केली आहे. लस आल्यास तिचं व्यवस्थापन कसं करायचं याची पालिकेने सुरुवात केल्याचे दिसते.

आपल्या फार्माकोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी विभाग वगळता पालिकेच्या चार रुग्णालयांनी कोविड- 19 लसीच्या कुप्यांचा साठा करण्यासाठी त्यांच्या दुग्धपेढी आणि त्वचापेढीत जागा करण्यास सुरुवात केली आहे. कूपर रुग्णालय, सायन नायर, केईम रुग्णालयांना लस सेंटर म्हणून घोषित करण्यात आला आहे. मात्र त्यांचं सध्याचे इन्फ्रास्ट्रक्चर लक्षात घेता या औषधाचा साठा करणे जिकरीचे ठरू शकतो.

या रुग्णालया बरोबरच कांजूरमार्ग येथील पाच मजल्याच्या बिल्डिंगमध्ये देखील या लसी ठेवल्या जातील. 15 डिसेंबरपर्यंत हे बिल्डिंग कोल्ड स्टोरेज सुविधेत बदलली जाईल ही बिल्डिंग तयार झाल्यानंतर पालिकेकडे औषधाच्या पाच लाख कुप्या साठवण्याची क्षमता असेल. 

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या निर्देशानुसार आम्ही लसीसाठी जागा तयार करण्यास सुरुवात केल्याची माहिती सायन रुग्णालयाचे डीन डॉक्टर मोहन जोशी यांनी दिली. ते पुढे म्हणाले, जर ऑक्सफर्ड- एस्ट्राझेन्काला मान्यता मिळाल्यास आम्ही या औषधाला आमच्या कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवू. त्याचे तापमान 2 ते 8 डिग्री सेल्सिअस आहे. रुग्णालयाने आणखी रेफ्रिजरेटरची तजवीज करण्यास सुरुवात केली असून रुग्णालयातील शक्य असलेल्या सगळ्या बँक लसीचा साठा करण्यासाठी वापरल्या जातील.

काकाणी यांचं म्हणणं आहे की, फ्रंटलाईन वर्कर्स ना लागतील एवढ्या औषधाच्या कुप्या साठवण्याची तरी रुग्णालयाची क्षमता हवी. चार पैकी प्रत्येक रुग्णालयात कमीत कमी 40000 कूप्या साठवता येतील. मात्र जेव्हा सामान्यांना लसीची गरज वाढेल तेव्हा साठवण्याची क्षमता वाढवावी लागेल.

फार्माकोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी विभागासह रक्तपेढी आणि प्लाझ्मा बँकेत जागा करण्याची सुरुवात केल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.

नायर रुग्णालयात देखील कुप्यांचा साठा करण्यासाठी रक्त पेढीचा वापर करण्यात येणार असून त्यांनीही आणखी कोल्ड स्टोरेजची मागणी केल्याची माहिती रुग्णालयाचे डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे.  या पालिकेच्या रुग्णालयांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना लसीच्या ड्राइव्हसाठी ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली असून औषधाचे बॉक्स कसे हाताळायचे त्याची सध्या ट्रेनिंग दिली जाते आहे.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

BMC preparation for corona vaccination will be done at the municipal hospital

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com