
मुंबई: मुंबई महापालिकेने (BMC) लस खरेदीसाठी (vaccine procurment) काढलेल्या जागतिक निविदांना अखेर प्रतिसाद मिळाला आहे. तीन लस उत्पादक कंपन्यांनी महापालिकेच्या प्रस्तावात रुची दाखवली आहे. मुंबईत वेगाने लसीकरण करता यावे, यासाठी मुंबई महापालिकेने १ कोटी लसींचे डोस विकत घेण्यासाठी जागतिक निविदा काढल्या आहेत. काल या निविदांची मुदत संपणार होती. पण कंपन्यांना कागदपत्रांची पूर्तता करता यावी, यासाठी ही मुदत एक आठवड्याने वाढवण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. (BMC receives proposals from three companies to procure vaccines)
तिन्ही कंपन्यांनी रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचा पुरवठा करण्याची तयारी दाखवलीय. दोन प्रस्ताव भारतीय कंपन्यांकडून आले असून एक कंपनी परदेशात नोंदणी झालेली आहे. आम्ही सर्व प्रस्तावांची व्यवस्थित छाननी करु. केंद्राकडून सर्व परवानग्या मिळवण्याची जबाबदारी या कंपन्यांची असेल. अजूनपर्यंत लसींची किंमत जाहीर झालेली नाही. मुंबईत कुठलाही नागरिक लसीपासून वंचित राहू नये, त्यांचे लवकरात लवकर लसीकरण व्हावे, यासाठी मुंबई महापालिकेची लस खरेदीची योजना आहे.
मुंबई महापालिका या लस खरेदीवर ३०० ते ७०० कोटी रुपये (vaccine spending) खर्च करणार आहे. संबंधित कंपनीला लस पुरवठा करण्याचे आदेश मिळाल्यानंतर तीन आठवड्याच्या आत पुरवठा सुरु करणे बंधनकारक आहे. मुदतीत पुरवठा न झाल्यास अथवा मध्येच पुरवठा थांबल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे, असे या निविदा पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.