
मुंबई : मुंबईत अंथरुणाला खिळून असणाऱ्या रुग्णांच्या लसीकरणाचा (Corona Vaccination) शुभारंभ येत्या 2 ऑगस्टपासून होणार आहे. या बेडरिडन रुग्णांच्या(Old age patient) लसीकरणासाठी वॉर्ड स्तरावर पालिकेकडून डेटा गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे. आतापर्यंत पालिकेकडे (BMC) अंथरुणाला खिळलेल्या किमान 4 हजार 488 रुग्णांची नोंद झाली आहे. या लसीकरणासाठी काही सामाजिक संस्थांची (Social organization) मदत घेतली जाणार आहे. हे लसीकरण पहिल्यांदा एका छोट्या वॉर्डमध्ये प्राथमिक स्तरावर येत्या एक ते दोन दिवसांत केले जाईल. त्यातून जाणवणाऱ्या त्रुटी, अडचणी आणि यंत्रणेसंबंधित ज्या समस्या आढळतील त्यात सुधारणा करुन संपूर्ण मुंबईभर करण्याचा पालिकेचा प्रयत्न असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. ( BMC registered more than four thousand and five hundred old age patients for vaccination-nss91)
जी दक्षिणमध्ये सर्वाधिक नोंद
अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांच्या लसीकरणासाठीची सर्वाधिक नोंद ही मुंबईतील जी दक्षिण वॉर्डमध्ये झाली आहे. जी दक्षिणमध्ये आतापर्यंत 381 अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांची नोंद झाली आहे. लसीकरणासाठी या रुग्णांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन असणे बंधनकारक आहे. तसंच, त्यांच्या डॉक्टरांनी तो रुग्ण बेडरिडन आहे की नाही याबाबतचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. तसंच, स्वत: चे सहमती पत्र द्यावे लागणार आहे. आणि सर्वात शेवटी लस दिल्यानंतर अर्धा तासाच्या निरीक्षणासाठी त्यांचा स्वत: चा डॉक्टर तिथे उपलब्ध असणे अनिवार्य आहे. या सर्व गोष्टी तिथे असतानाचा लस दिली जाणार आहे असे पालिका अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
लसीकरणाच्या अडचणी बऱ्याच
एका वायलमध्ये 12 डोस असतात. हे डोस चार तासात संपवायचे असतात. नाहीतर ते वाया जाण्याची शक्यता असते. पण, डोस दिल्यानंतर अर्धा तास दिलेल्या व्यक्तीच्या निरीक्षणासाठी दिला तर 4 तासात फक्त आठ डोस देऊन होतील. त्यातच घरोघरी जाऊन त्यांना डोस दिला गेला तर तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवासाचा वेळही वाढतो. त्यामुळे, बेडरिडन रुग्णांना घरोघरी जाऊन डोस द्यायचा विचार केला तर किमान 33 टक्के डोस वाया जाण्याची भीती पालिकेला सतावत आहे. झोपडपट्ट्यांमध्ये स्थानिक पातळीवर पोहोचून लसीकरण करणे ही बाब आव्हानात्मक ठरु शकते
योग्य व्यवस्थापनाची गरज
अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांच्या लसीकरणासाठी योग्य व्यवस्थापनाची गरज आहे. त्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. पालिकेकडून अशा रुग्णांची नोंद लसीकरणापूर्वीच केली जात आहे. कारण, डोस वाया जाऊ नये यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जाणार आहे. नोंदणी केलेल्या व्यक्ती लसीकरणासाठी पात्र आहेत का हे पडताळले जाणार आहे. शिवाय, त्या रुग्णाचा डॉक्टरही तिथे उपस्थित असला पाहिजे. वॉर्ड स्तरावरील आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबतचे जिओ मॅपिंग करण्यास सांगितले आहे.
त्यासाठी 12 लोकांची एक टिम तयार केली जाणार आहे. यात लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य सेविकांची ही मदत घेतली जाणार आहे. राज्य आणि पालिकेकडून 17 जुलै रोजी घरी अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांची सविस्तर माहिती ईमेलमार्फत पाठवण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार, आतापर्यंत साडेचार हजारांहून अधिक नावे नोंद झाली आहेत. “ अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तीचे नाव, त्यांच्या आजाराचे नाव, वय, पत्ता, संपर्क क्रमांक पाठवणे आवश्यक आहे. Covidvacc2bedrmitted@gmail.com वर ईमेल पाठवावा लागेल अशी माहिती पालिकेचे उपमुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष रेवणकर यांनी दिली.
सतत्या तपासूनच लसीकरण
आत्तापर्यंत चार हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले असून त्यांच्या संपूर्ण माहितीच्या पडताळणीसाठी संबंधित वॉर्डमध्ये ते पाठवले गेले आहेत. त्यांची सत्यता तपासल्यानंतर आरोग्य पथक 2 ऑगस्टपासून लसीकरणासाठी घरोघरी लसीकरणाची व्यवस्था करणार, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. महापालिकेच्या अंदाजानुसार, मुंबईत 25 लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत. फक्त 9.82 लाख लोकांना एक डोस मिळाला आहे. तर, 5.76 लाख लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळे, या गटातील अशी बरीचशी लोकसंख्या आहे जी अजूनही लसीकरण केंद्रावर पोहोचली नाही किंवा पोहचू शकत नाही. त्यामुळे ही मोहिम सुरू झाल्य…
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.