खासगी वाहनातून फिरताना आता मास्क न लावता बिनधास्त फिरा, कारवाई होणार नाही

समीर सुर्वे
Monday, 18 January 2021

खासगी वाहनांमधून फिरताना मास्क वापरण्याचे बंधन महानगर पालिकेने शिथील केले आहे.

मुंबईः खासगी वाहनांमधून फिरताना मास्क वापरण्याचे बंधन महानगर पालिकेने शिथील केले आहे. त्यामुळे वाहनातून प्रवास करताना मास्क वापरणे गरजेचे नाही. मात्र, सार्वजनिक वाहनांमधून फिरताना मास्क वापरणे गरजेचे असल्याचं महानगर पालिकेच्या घन कचरा विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

गेले 10 महिने मुकाबला केल्यावर काही प्रमाणात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. त्यामुळे अनेक नियमात शिथिलथा दिली जात आहे. मुंबईत मास्क वापरणे सक्तीचे होते, त्यातही शिथिलता देण्यात आली आहे. खासगी वाहनांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मास्कच्या कारवाईतून वगळण्याचे तोंडी आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी प्रशासनाला आणि क्लिनअप मार्शलला दिले आहेत.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोविडमुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यात वाहानांमधून प्रवास करतानाही मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले होते.आता पर्यंत सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांकडून 14 कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. आता कोविडचा धोका कमी झाल्याने पालिकेने काही नियमावलीत शिथीलता देण्याचा निर्णय घेतला आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या रिक्षा, टॅक्सी, बस, टॅम्पो, लोकल आदी वाहनांतील प्रवाशांना मास्क परिधान करणे सक्तीचे आहे. त्यामुळे असे प्रवाशी विनामास्क आढळल्यास कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच खासगी वाहनात प्रवासी संख्या पूर्वी प्रमाणेच राहील.

हेही वाचा- मटण - मासळीला सुगीचे दिवस, मटणाचे दर 200 रुपयांनी वाढले

महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी खासगी वाहनांमधून प्रवास करणाऱ्यांना मास्क वापरणे सक्तीचे नाही. त्यामुळे त्यांच्याकडून दंड आकारू नका, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसर लवकरच परिपत्रकही प्रसिद्ध केले जाणार आहे. मात्र,सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. बेस्टच्या बसेसमध्ये मास्क न वापरणाऱ्यांना प्रवेशच दिला जात नाही. बसेस, रिक्षा, टॅक्सी, लोकल, टेम्पो अवजड वाहने या वाहनांमध्ये मास्क वापरावा लागेल.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

bmc release ban wearing masks while traveling in private vehicles


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bmc release ban wearing masks while traveling in private vehicles