
मुंबई : मुंबईतून सुमारे एक लाख परप्रांतीय मजूर निघून गेले आहेत. महापालिका मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत साडेतीन लाख मजुरांना जेवण देत होती; ही संख्या अडीच लाखांपर्यंत कमी झाली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर महापालिकेने स्थलांतरित मजुरांना दोन वेळचे जेवण देण्यास सुरुवात केली. महापालिकेने 30 एप्रिलला 7300 मजुरांना जेवण दिले होते, 1 मेपर्यंत ही संख्या साडेतीन लाखांहून अधिक होती. केंद्र सरकारने स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यांत जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मागील पंधरवड्यात मुंबईतून सुमारे एक लाख मजूर गेले आहेत, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.
गरजू कुटुंबांचीही सोय
स्थलांतरित मजुरांबरोबरच रोजंदारी, घरकाम व इतर लहानमोठी कामे करणाऱ्या कुटुंबांनाही महापालिकेने जेवण देण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त संगीता हसनाळे यांनी दिली. सध्या अशा एक लाख व्यक्तींना रोज दोन वेळचे जेवण दिले जात आहे. स्थलांतरित मजुरांची संख्या कमी झाली असली; तरी अन्य गरजूंनाही महापालिका जेवण देत आहे. दररोज सात लाखांहून अधिक जेवणाची पाकिटे वितरित केली जातात; म्हणजे साडेतीन लाख व्यक्तींना जेवण दिले जात आहे.
पावणेदोन कोटींचा खर्च
महापालिका विविध संस्था, हॉटेलांकडून जेवण बनवून घेते. जेवणाच्या प्रत्येक पाकिटामागे 28 ते 30 रुपये दिले जाता. अन्नपाकिटे वाटण्यासाठी महापालिका दररोज एक कोटी 80 लाख रुपये खर्च करत आहे.
bmc spends crores of rupees every day on meals for the workers and the needy
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.