
गेल्या काही दिवसात कोविन अॅपमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. आजपासून दोन शिफ्टमध्ये कोरोना लसीकरणास सुरुवात होत आहे.
Corona Vaccination: म्हणून आजपासून दोन शिफ्टमध्ये कोरोना लसीकरण
मुंबई: आजपासून दोन शिफ्टमध्ये कोरोना लसीकरणास सुरुवात होत आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. सकाळी ७ ते २ मध्ये पहिली शिफ्ट तर दुपारी २ ते रात्री ९ अशी दुसरी शिफ्ट असेल. याआधी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत लसीकरण करता येत होतं.
गेल्या काही दिवसात कोविन अॅपमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर
तिसर्या टप्प्यातील लसीकरण वाढवण्यासाठी सर्व लसीकरण केंद्रांत पाळ्यांमध्ये लसीकरण करण्यासाठी पालिका आणि राज्य सरकारने कंबर कसली. त्यामुळे, पालिकेतील लसीकरण केंद्रासोबत राज्यभरातील लसीकरण केंद्रात 2 पाळ्यांमध्ये लसीकरणास सुरूवात करून जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. त्यानंतर मार्च महिन्याच्या सुरुवातीला मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं होतं की, टप्प्प्याटप्प्याने दोन शिफ्टमध्ये लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
दरम्यान मुंबईत आतापर्यंत 10 लाख लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले आहे. एकूण उद्दिष्टाच्या केवळ 20 टक्के लसीकरण झाले आहे. त्यात आता सरसकट 45 वर्षे वयावरील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार असल्याने ताण अधिक वाढणार आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे लवकरात लवकर लसीकरण उरकायचे असल्याने पालिका प्रशासनाला त्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. आजपासून 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणामुळे मुंबईत सध्या सुरू असलेल्या मोहिमेत साधारण 40 लाख नागरिकांची भर पडणार आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी महानगरपालिके मार्फत 2 शिफ्टमध्ये लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. मुंबईत आतापर्यंत उद्दिष्टाच्या साधारण 20 टक्केच लसीकरण झाले असून आतापर्यंत 10 लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे.
----------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Bmc start Corona vaccination two shifts morning 7 to 2 and afternoon 2 to 9
Web Title: Bmc Start Corona Vaccination Two Shifts Morning 7 2 And Afternoon 2 9
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..