esakal | वैद्यकिय अभ्यासक्रमाच्या जागा वाढवायच्या कशा ? महापालिकेने घेतला 'हा' निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

doctors

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढवायच्या कशा ? महापालिकेने घेतला 'हा' निर्णय

sakal_logo
By
- समीर सुर्वे

मुंबई : कोविडकाळात (Corona Period) भारतातील डॉक्‍टरांबरोबरच (Indian Doctors) अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेचा (Health System) गंभीर प्रश्‍न पुढे आला होता. डॉक्‍टरांची संख्या वाढावी म्हणून गेली अनेक वर्ष प्रयत्न सुरु आहेत. 2015 मध्ये केंद्र सरकारने (Central Government) वैद्यकीय महाविद्यालयाची क्षमता वाढविण्याची तयारी केली. पण,वाढलेल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आवश्‍यक वरीष्ठ वैद्यकिय प्राध्यपाकच (Medical Professor) नसल्याने अडचणी येत आहेत. यावर उपाय म्हणून महानगरपालिकेने (BMC) आता निवृत्त होणाऱ्या ज्येष्ठ प्राध्यापकांना कंत्राटी पध्दतीने सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. (BMC Takes Decision of Retired medical Professor on contract basis for medical studies)

केंद्र सरकारने 2015 सर्व वैद्यकिय महाविद्यालयांची क्षमता 50 टक्के वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी महाविद्यालयांकडून अर्ज मागविण्यात आले होते. मात्र,महानगरपालिकेने फक्त शिव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या महाविद्यालयाची क्षमता 50 टक्‍क्‍यांनी वाढवली आहे. इतर वैद्यकिय महाविद्यालयातील संख्या अद्याप पूर्ण क्षमतेने वाढविण्यात आलेली नाही. असा आक्षेप भाजपने घेतला आहे. भाजपचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी याबाबत आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून याकडे लक्ष वेधले असून याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. महापालिकेने इतर महाविद्यालयाची प्रवेश क्षमता 50 टक्‍क्‍यांनी वाढविण्यासाठी अर्जही केलेला नाही. कोविड काळात डॉक्‍टरांच्या तुटवड्याचा प्रश्‍न होता. त्यामुळे याकडे गांभिर्याने बघण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नाशिक महापालिका सज्ज

महानगर पालिकेचे प्रमुख रुग्णालय आणि वैद्यकिय शिक्षण संचलक डॉ.रमेश भारमल यांनी आता 200 जागा वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले. 200 जागा वाढणे म्हणजे नवे वैद्यकिय महाविद्यालय तयार होणे आहे. तर,विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता वाढल्यास तेवढ्या प्रमाणात प्राध्यापाकांची गरज असते. हे नियोजन करावे लागते. त्यासाठी निवृत्त होणाऱ्या प्राध्यापकांना पुन्हा कंत्राटी सेवेत घेण्यात येणार आहे. या प्रस्तावाला आयुक्तांनीही परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्व नियोजन करुन जागा वाढविण्यात येतात असेही त्यांनी सांगितले. महानगर पालिकेची चार वैद्यकिय महाविद्यालये आहेत. त्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. पदवीच्या 100 आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 100 जागा प्रत्येक महाविद्यालयात होत्या. त्यात आता काही प्रमाणात वाढ झाली आहे.

विद्यार्थ्यांची संख्या वाढवताना प्राध्यापकांची ज्या प्रमाणात गरज असते त्याच पध्दतीने प्रयोगशाळा,इतर इंफ्रास्ट्रक्‍चर तसेच निमवैद्यकिय कर्मचारी यांचीही गरज असते. त्यात टप्प्या टप्प्याने वाढ केली जात आहे. क्षमता मेडिकल कॉन्सीलच्या निकषानुसारचा करावी लागते. थेट प्रवेश क्षमता वाढवली आणि आवश्‍यक सुविधा नसतील तर मान्यताही रद्द होऊ शकते. असेही सांगण्यात आले.

loading image