कोस्टल रोडसाठी विना परवानगी भरावामुळे BMC अडचणीत; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

समीर सुर्वे
Saturday, 5 September 2020

मुंबई महापालिकेने 6 हेक्टर अतिरिक्त भराव टाकण्यास सुरवात केली आहे, असा आरोप करणाऱ्या याचिकेवर मंगळवारी (ता.8) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेने सागरी किनारा संरक्षण कायद्याअंतर्गत सुमद्रात 90 हेक्टर भराव टाकण्याची परवानगी घेतली होती. मात्र, आता 6 हेक्टर अतिरिक्त भराव टाकण्यास सुरवात केली आहे, असा आरोप करणाऱ्या याचिकेवर मंगळवारी (ता.8) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

क्रॉफर्ड मार्केट अपघात प्रकरण; चालकाच्या मानसिक स्थितीची तपासणी; परवाना रद्द करण्याबाबत पोलिसांची विनंती

महापालिकेने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पर्यावरण मंत्रालयाने 96 हेक्टर समुद्रात भराव टाकण्यास परवानगी दिल्याचा दावा केला होता. मात्र, पालिकेने फक्त 90 हेक्टर भरावाची परवानगी घेतली होती, असे याचिकाकर्त्या श्वेता वाघ यांनी सांगितले आहे. पालिकेच्या नकाशाची तुलना केल्यावर 90 हेक्टर समुद्रात भरावाची परवानगी असल्याचे स्पष्ट होते. तसे, आम्ही सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातही नमुद आहे, असे वाघ यांनी म्हटले आहे. याप्रकरणी पालिकेने आज नवे प्रतिज्ञापत्र सादर केले असून त्यात हा भराव नसून लाटांपासून आणि भरतीपासून संरक्षण होण्यासाठी संरक्षक भिंतीसदृष्य बांधकाम असल्याचे म्हटले आहे, अशी माहिती वाघ यांनी दिली. मात्र, या बांधकामासाठी भराव टाकावाच लागणार असून हे भराव टाकण्याचे कामही सुरु असल्याचा दावा श्वेता वाघ यांनी केला आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी पालिकेचे उपायुक्त राजिव कुकनूर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.

हात प्रत्यारोपणानंतर मोनिकाच्या प्रकृतीत सुधारणा; फिजिओथेरपी सुरू करणार

आतापर्यंत 52 हेक्टर भराव
मुंबई महापालिका मरीन लाईन्स ते वरळी सागरी सेतू पर्यंत सुमारे 10 किलोटरचा कोस्टल रोड बांधत आहे. त्यासाठी आतापर्यंत 52.35 हेक्टर समुद्रात भराव टाकण्यात आला आहे. तर अजून 44.16 हेक्टर समुद्रात भराव टाकणे प्रस्तावित आहे.

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BMC in trouble due to unauthorized payment for Coastal Road; Supreme Court hearing

टॉपिकस
Topic Tags: