मुंबईकरांसाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी BMC चे मेगा नियोजन; जाणून घ्या विसर्जनाची नियमावली आणि स्थळे

मुंबईकरांसाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी BMC चे मेगा नियोजन; जाणून घ्या विसर्जनाची नियमावली आणि स्थळे

मुंबई : अनंत चतुर्दशीला मंगळवारी (ता.1) होणाऱ्या गणपती विसर्जनासाठी 445 कृत्रिम, नैसर्गिक विसर्जन स्थळे तयार करण्यात आली असून महापालिकेचे 23 हजार कर्मचारी तैनात आहे. अनंत चतुर्दशीला समुद्र, तलाव अशा नैसर्गिक विसर्जन स्थळावर विसर्जन करता येणार नसून भाविकांना मुर्ती दान करण्याची सुचना महापालिकेने केली आहे. घरगुती गणपतींचे विसर्जन घरीच करावे अशी सुचना महापालिकेने केली आहे.

प्रतिबंधित क्षेत्र, तसेच सील इमारतींच्या परीसरात असलेल्या सार्वजनिक मंडळांच्या गणेशमुर्तीचे विसर्जन मंडपातच करावे. तर, अशा भागातील घरगुती मुर्तींचेही विसर्जन घरातच करणे बंधनकारक असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.तसेच नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळावर होणारी गर्दी टाळण्यासाठी विसर्जनाची आरती घरुनच करुन येण्याची सुचना महापालिकेने केली आहे.

मुंबईत गेल्या वर्षी एकूण 1 लाख 80 हजारहून अधिक घरगुती आणि 13 हजारच्या आसपास सार्वजनिक गणपतींचे विसर्जन झाले होते.यंदा ही संख्या कमी होणार आहे.मात्र,अनंत चतुर्थीला गर्दी होऊ नये म्हणून पालिकेने हे नियोजन केले आहे.

मुंबईत 70 नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत.या विसर्जन स्थळांच्या 1 ते दिड किलोमिटर परीसरातील नागरीकांनाा नैसर्गिक विसर्जन स्थळावर विसर्जन करण्याची परवानगी आहे.मात्र,तेथेही स्वता विसर्जन करता येणार नसून पालिकेच्या मुर्तीसंकलन केंद्रात मुर्ती दान करायची आहे. त्यासाठी 70 विसर्जन स्थळावर मुर्तीदान केंद्र तयार करण्यात आले आहे.त्याच.बरोबर प्रत्येक विभागात 7 ते 8 मुर्ती संकलन केंद्र तयार करण्यात आले आहेत.

कृत्रिम तलावांचे लोकेशन 

 कृत्रिम तलाव संख्या-168  , मूर्ती संकलन केंद्र- 170, फिरती विसर्जन स्थळे -37, नैसर्गिक विसर्जन स्थळे -70

कृत्रिम तलावांची माहिती पत्‍त्‍यासह तसेच गुगल लोकेशनसह महापालिकेच्‍या https://portal.mcgm.gov.in  या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध आहे.

मास्क सामाजिक अंतर आवश्यकच 

राज्य सरकाने विसर्जन मिरवणुकीवर बंदी घातली आहे.घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी 5 जणं आणि सार्वजनिक मुर्तीच्या विसर्जनासाठी 10 पेक्षा जास्त जणांनी जमू नये असे आवाहन केले आहे.त्याच बरोबर प्रत्येकाला मास्क वापरणे सामाजिक अंतर राखणे बंधनकारक आहे.

तीप्पट मनुष्यबळ 

या वर्षी नागरीकांना विसर्जन स्वता करता येणार नसून त्यांना मुर्तीदान करावी लागणार आहे.त्यामुळे गेल्या वर्षी पेक्षा तीप्पट मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.तसेच अग्निशनम दलाचे बंब आणि जलतरणपट्टूही तैनात ठेवण्यात आले आहे.

समुद्र किनार्यांवर स्टिल  प्लेट -896

नियंत्रण कक्ष -78,

जीव रक्षक -636,

 मोटर बोट -65,

 प्रथम उपचार केंद्र -69

  रुग्णवाहिका संख्या- 65,

स्वागतकक्ष -81 ,

तात्पुरती शौचालय- 84,

 निर्माल्य कलश -368

 निर्माल्य वाहन /डंपर/ टेम्पो- 467

 फ्लड लाईट - 2717

 सर्च लाईट -83 

 विद्युत व्यवस्था- आवश्यकतेनुसार 

संरक्षण कठडे -आवश्यकतेनुसार

 निरीक्षण मनोरे- 42

तलावांमध्ये जर्मन तरफा -45 

मनुष्यबळ(कर्मचारी)- 19503

 मनुष्यबळ (अधिकारी)- 3869

-------------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com