'वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव'; होड्यांची स्पर्धा पाहण्यासाठी गाव लोटला

सुनिल पाटकर
Monday, 25 January 2021

सावित्री नदीत रविवारी सकाळी होड्यांची स्पर्धा रंगली. महाड परिसरात प्रथमच अशी स्पर्धा होत असल्याने ती पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

महाड  : तालुक्‍यातील दासगाव गावाजवळ सावित्री नदीत रविवारी सकाळी होड्यांची स्पर्धा रंगली. यामध्ये प्रथम क्रमांक प्रियेश निवाते, धर्मेंद्र पड्याळ आणि सतीश निवाते यांच्या संघाने पटकावला. महाड परिसरात प्रथमच अशी स्पर्धा होत असल्याने ती पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. 

सावित्री नदीकिनाऱ्यावर पगारीतून (होडीचा एक प्रकार) मासेमारी आणि वाळू उपशाचा पारंपारीक व्यवसाय करणारा भोई समाज विखुरलेला आहे. या समाजाच्या पारंपारिक व्यवसायाच्या खुणा यांत्रिक युगात नष्ट होतात की काय, असे वाटत असताना "मी दासगावचा भोई' ही संकल्पना घेऊन परिसरातील तरूणांनी होड्यांची स्पर्धा घेतली. मुंबईतील रंगावली संस्कार जोपासना ग्रुप आणि दासगाव भोई समाजतर्फे ही स्पर्धा घेण्यात आली. प्रथम क्रमांक प्रियेश निवाते, धर्मेंद्र पड्याळ, सतीश निवाते यांच्या होडीने पटकावला. द्वितीय क्रमांक पांडुरंग मिंडे, स्वप्नील जाधव, ठकसेन निवाते यांच्या होडीला; तर तृतीय क्रमांक अशोक मिंडे, गणेश मिंडे, अविनाश मिंडे यांच्या होडीने पटकावला. संदीप मिंडे, शिशुपाल कर्जावकर, देवेंद्र निवाते यांच्या होडीला चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

स्पर्धेतील आकर्षक होडी सजावटीसाठी संतोष पड्याळ यांची, तर होडी वल्हवणारे उत्कृष्ट भोई म्हणून सतीश निवाते यांची निवड करण्यात आली. स्पर्धेत पारंपरिक पेहरावासाठी अशोक मिंडे यांचा गौरव करण्यात आला. कोकण रेल्वेच्या पुलाखालुन या स्पर्धेची सुरुवात झाली. पकटीपर्यंत समारोप करण्यात आला. भोई समाजातील जेष्ठ नागरीक यांचे हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. दासगावची प्राचिन बंदर ही ओळख पर्यटनाच्या व्यवसायात रुपांतर झाली, तर या खाडीकडे व जीर्ण होणाऱ्या दासगाव बंदराला पुनर्जीवन मिळेल, अशी ग्रामस्थांना आशा आहे

A boat race was held on Sunday morning in Savitri river near Dasgaon village in Mahad taluka

---------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A boat race was held on Sunday morning in Savitri river near Dasgaon village in Mahad taluka