Bois Locker Room! विशीतील मुलांच्या गृपमध्ये सुरू होती 'ही' चर्चा... वर्गातील मैत्रिणीने ट्वीटरवर लीक केले चॅट

Bois Locker Room! विशीतील मुलांच्या गृपमध्ये सुरू होती 'ही' चर्चा... वर्गातील मैत्रिणीने ट्वीटरवर लीक केले चॅट


नवी दिल्ली ः सामूहीक बलात्काराचे समर्थन कोणी करेल, त्याबाबत विचार मांडत असेल असे कोणास वाटत नसेल तर परत एकदा विचार करा. यासंदर्भातील ग्रुप समाजमाध्यमांवर सक्रीय आहेत. आश्चर्य म्हणजे त्याकडे लक्ष वेधल्यावरही अद्याप पोलिस कारवाई झालेली नाही.

बॉईस लॉकर रुम नावाचा एक ग्रुप चांगलाच `सक्रीय' असल्याचे म्हणावे लागेल. हा टीनएज मुलांचा ग्रुप केवळ सामूहिक बलात्काराचे समर्थनच करीत नाही, तर वर्गातील मुलींवर लैगिक अत्याचार कसे करता येतील याची ग्रुपमध्ये खुली चर्चा करतो. 

दिल्ली पोलिसांच्या सोशल मिडिया सेलकडूनच या ग्रुपवर कारवाई अपेक्षित होती. पण ती होत नाही हे बघितल्यावर त्या मुलांच्या वर्गातीलच एका मुलीने याबाबत ट्वीट केले. त्यानंतर ट्वीटरवर त्यांची ओळखही देण्यात आली. त्याचवेळी पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा बाळगण्यात आली, पण अद्याप काहीच घडलेले नाही. काहींनी ग्रुपमधील अनेक सदस्यांनी याबाबत कोणतीही टिप्पणी केलेली नाही याकडेही लक्ष वेधले आहे. 

प्रकरण दिल्लीतील आहे म्हणून मुंबईकरांनी त्याकडे कानाडोळा करुन चालणार नाही. फार दूर नाही गतवर्षी डिसेंबरमध्ये मुंबईतील तेरा चौदा वर्षांच्या मुलांना वर्गातील मुलींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी समाजमाध्यमांवर केल्याबद्दल शाळेतून काढले होते. या शाळेत अनेक उच्चभ्रूंची मुले शिकतात. त्यावेळी वर्गातील मुलींबाबत शेरेबाजी करताना सामूहीक बलात्कार, लेस्बियन, गे असे शब्द वापरले गेले होते. 

मूळात समाजमाध्यमांवर या प्रकारचे ग्रुप तयार होण्यापासून रोखणार कसे हा प्रश्न आहे. याबाबतचे काही ऊघड झाल्यावर समाजमाध्यमांवर टीका टिप्पणी होते. पण या प्रकारची टिप्पणी कोणत्याही ग्रुपमध्ये सहज बोलतानाही होत असते, असा काहींचा दावा आहे. त्याचबरोबर या मुलांवरील कारवाईस विरोध करणारे आत्तापर्यंत टीनएज वयातील मुलांनी सामूहीक बलात्कार केल्याचा एकही प्रसंग घडला नसल्याचे सांगतात. 

अर्थात अनेकांना हे मान्य नाही. सहज होणारी टिप्पणी आणि त्यासंदर्भात चॅट करीत राहणे यात फरक आहे. केवळ टिप्पणीची मर्यादा कधी ओलांडली जाईल हे सांगता येत नाही असा इशाराही दिला जात आहे. मात्र काही अभ्यासक कारवाईपूर्वी याबाबतच्या चॅट तसेच ग्रुप मेंबरच्या छायाचित्रांची वैधता तपासून घेण्याचे आवाहनही करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com