ST Bus Accident: एसटी आगारात बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटला अन्...; चालक गंभीर जखमी तर...
Palghar News: बोईसर एसटी आगारात बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत चालक गंभीर जखमी झाला असून बसस्थानकात या प्रकारामुळे घबराट निर्माण झाली आहे.
पालघर : बोईसर एसटी आगारात बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस थेट हिरकणी कक्षाला जाऊन धडकली. आज (सोमवार) दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून यामध्ये चालक गंभीर जखमी झाला आहे.