MIDC Land Acquisition: महागावात एमआयडीसी भूसंपादन सर्वेक्षणाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; मोजणी थांबवावी लागली

महागावात एमआयडीसीच्या भूसंपादनाविरोधात ग्रामस्थांचा संताप; नोटिसा न मिळाल्याचा आरोप करत सर्वेक्षण पथकाला मोजणी रोखली
Opposition to MIDC Land Acquisition Survey in Mahagaon

Opposition to MIDC Land Acquisition Survey in Mahagaon

Sakal

Updated on

संतोष घरत

बोईसर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) प्रस्तावित भूसंपादनाच्या पार्श्वभूमीवर महागाव येथे बुधवारी (ता. १८) करण्यात येणाऱ्या जमीन सर्वेक्षणाला जमीनमालक आणि ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. सर्वेक्षणासाठी आलेल्या पथकाला ग्रामस्थांनी मोजणी करू दिली नाही. प्रस्तावित भूसंपादनालाच विरोध असल्याचे स्पष्ट करत, आधी जमीनमालकांच्या हरकतींचा कायदेशीर पद्धतीने विचार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com