esakal | बॉलिवूड ड्रग्स प्रकरणः A, D, S म्हणजे काय? NCBच्या अधिकाऱ्याकडून बड्या अभिनेत्याच्या नावाचा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणः A, D, S म्हणजे काय? NCBच्या अधिकाऱ्याकडून बड्या अभिनेत्याच्या नावाचा खुलासा

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. एनसीबीच्या चौकशीदरम्यान ड्रग्स पॅडलर्संनी बॉलिवूडमधल्या मोठ्या अभिनेत्याची नावं घेतल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी शाहरुख खान, अर्जुन रामपाल आणि डिनो मोरिया यांची नावं घेतल्याचं समजतंय.

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणः A, D, S म्हणजे काय? NCBच्या अधिकाऱ्याकडून बड्या अभिनेत्याच्या नावाचा खुलासा

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणी बड्या अभिनेत्रींची सध्या चौकशी सुरु आहे. दरम्यान आता समोर आलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. एनसीबीच्या चौकशीदरम्यान ड्रग्स पॅडलर्संनी बॉलिवूडमधल्या मोठ्या अभिनेत्याची नावं घेतल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी शाहरुख खान, अर्जुन रामपाल आणि डिनो मोरिया यांची नावं घेतल्याचं समजतंय. आतापर्यंत या प्रकरणात बड्या अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. पहिल्यांदाच आता मोठ्या अभिनेत्याची समोर आल्याचं कळतंय. दैनिक भास्करनं यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

दिल्लीतल्या एका एनसीबीच्या अधिकाऱ्यानं आपलं नावं न सांगण्याच्या अटीवर बॉलिवूडमधील या मोठ्या नावांचा खुलासा केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये या अभिनेत्याची नावं येत होती. मात्र त्याच्या बदलात A, D, आणि S अशी कोडनाव सांगितली जात होती. 

आता यामुळे हे स्पष्ट झालं आहे की, A चा अर्थ अर्जुन रामपाल, D चा डिनो मोरिया आणि S चा अर्थ शाहरुख खान आहे. एनसीबी अधिकाऱ्यानं सांगितलं की, ड्रग्स पॅडलर्संच्या सुत्रांनी सांगितलं की अर्जुन रामपाल शाहरुख खानला ड्रग्सचा पुरवठा करत होता. मात्र डिनो मोरिया कोणाला ड्रग्सचा साठा पुरवत होता? यावर अधिकाऱ्यानं सांगितलं की, याचा तपास करणं बाकी आहे. सध्या चौकशी सुरु आहे. 

एनसीबी अधिकाऱ्यासोबत साधलेला संवाद जशाच्या तसा

प्रश्नः एनसीबीला या नावांविषयी कोणी सांगितले?

अधिकारीः ड्रग्स पॅडलरचा एक सोर्स आहे. त्याने सांगितलं की, अर्जुन रामपाल शाहरुखच्या घरी ड्रग्स घेऊन जातो. जशी ही माहिती अनफोल्ड होईल, टेक्निकल पुराव्याच्या आधारावर आम्ही या संशयित अभिनेत्यांविरोधात पावलं उचलू. 

प्रश्नः पॅडलरचा सोर्स कोण आहे, त्याचं नाव काय आहे?

अधिकारीः ते राहू दे आता... तो पॅडलरचा सोर्स असलेल्या व्यक्ती बाहेरचा आहे. दोन इंटेलिजेंन्सचा इनपुट आहे, सोर्स कोणाताही सेकेंड क्लास व्यक्ती नाही आहे, जो असाच येऊन एनसीबीला सांगत आहे. हा एक इंटरनॅशनल एजन्सीचा इनपूट आहे.

प्रश्नः हा पॅडलर कोण आहे, ज्याचा सोर्सनं सांगितलं आहे? डेव्हिड किंवा अनुज केसवानी की आणखी कोणी?

अधिकारीः या सर्वाचा सध्या तांत्रिकदृष्ट्या संबंध नाही. पॅडलर डेव्हिड हे संबंध नसलेले आहेत. हे बुद्धिमत्ता इनपुटसह पूर्णपणे विश्वासार्ह व्यक्ती आहे, जो पॅडलरच्या संपर्कातील एक सहकारी आहे. त्यासोबत अर्जुन रामपाल सोबतही राहिला आहे. शाहरुखचा अर्जुनसोबत संबंध असल्याचा आपल्याकडे विश्वासार्ह पुरावा आहे आणि डिनो मोरिया आणखी कोणासोबत तरी आहे. 

प्रश्नः डिनो मोरिया कोणाला सप्लाय करत होता?

अधिकारीः ही गोष्ट त्यालाच विचारण्यात येईल. डिनो मोरियाच सांगू शकतो कि, तो कोणाकोणाला सप्लाय करत होता. 

प्रश्नः आता या सर्वांना एनसीबी कधीपर्यंत समन्स पाठवेल?

अधिकारीः या प्रकरणात समन्स नसेल. सीधे बंदे उठेंगे, त्यानंतरच सर्व काम होईल.

प्रश्नः  बंदा उठने का मतलब?

अधिकारीः बघूया, आता आम्ही लोक सध्या काम करत आहोत. 

प्रश्नः आता दीपिका, सारा, श्रद्धा यांच्याबाबत काय अपडेट आहे? यांना पुन्हा समन्स पाठवणार का? 

अधिकारीः सध्या तरी नाही. आणखी काही झाल्यास नक्की पाठवण्यात येईल. मात्र आता नाही.

प्रश्नः आज पुन्हा रिया- शौविक यांच्या प्रकरणात हायकोर्टाची ऑर्डर आली.

अधिकारीः संध्याकाळी साडे सहापर्यंत तरी आली नव्हती. 

प्रश्नः आता दोन नावं तर आहेत, पण शाहरुखसोबत काय कराल, त्यांचे तर खूप मोठं नाव आहे?

अधिकारीः त्यांना आंतरराष्ट्रीय इंटेलिजेंसकडून इनपुट प्राप्त झाले आहे, आता पुढे कसं काय होईल, त्यावर एनसीबी तयारी करत आहे.

शाहरुख आहे दुबईमध्ये 

शाहरुख सध्या दुबईमध्ये आहे आणि आयपीएल एन्जॉय करत आहे. तर अर्जुन रामपाल मुंबईत असून एक सिनेमाची शूटिंग करत आहे. तर रणबीर कपूर गेल्या बऱ्याच दिवसांपासून मुंबईत आहेत. काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबियांसोबत बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला होता. डिनो मोरियाही सध्या मुंबईत आहे. 

R म्हणजे कोण?

एनसीबीच्या सुत्रांच्या हवालानुसार असं समजतं की, R म्हणजेच रणबीर कपूर असण्याची शक्यता आहे. दरम्यान शाहरुख-अर्जुनसारखे इंटेलिजेंस इनपुट अद्याप प्राप्त झाले नाही. दोन दिवसांपासून टीव्ही चॅनेल आणि सोशल मीडियावर त्यांचं नाव व्हायरल होत आहे. २८ जुलै २०१९ ला करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीत दीपिकासोबत रणबीर देखील उपस्थित होता. या पार्टीत कलाकारांनी कोणत्याही प्रकारचे ड्रग्स घेतले नव्हते, असं करण जोहरनं स्पष्ट केलं होतं.

Bollywood narcotic Case What is A D S NCB official reveals big actors name