प्रेयसीचा गळा चिरून; स्वतःच्याच तोंडात फोडला सुतळी बॉम्ब, मालाडमधील धक्कादायक घटना

तुषार सोनवणे
Tuesday, 17 November 2020

मलाडच्या कुरार परिसरात प्रेयसीचा गळा चिरून हत्या करण्याचा प्रतत्न केल्यानंतर,  प्रियकराने स्वतःच्या तोंडात सुतळी बॉम्ब फोडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

मुंबई - मलाडच्या कुरार परिसरात प्रेयसीचा गळा चिरून हत्या करण्याचा प्रतत्न केल्यानंतर,  प्रियकराने स्वतःच्या तोंडात सुतळी बॉम्ब फोडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

दिवाळीच्या धामधूमीत मलाड परिसर एका विचित्र घटनेने हादरले आहे. मलाडच्या पुषपार्कमद्ये राहणारी 57 वर्षीय महिलेचे 55 वर्षीय व्यक्तीशी गेल्या 15 वर्षापासून प्रेमसंबध होते. या महिलेला दोन मुली आणि एक मुलगा आहे. महिला अंधेरीतील एका सोसायटी मध्ये कुक म्हणून काम करते. 

हेही वाचा - भिवंडीतल्या भावाकडून बिहारमध्ये राहणाऱ्या बहिणींना भाऊबीजेचं अनोखं गिफ्ट

आरोपी व्यक्ती ड्रायव्हर असून त्याचे संबधित महिलेशी गेल्या 15 वर्षापासून प्रेमसंबध होते. त्याच्या या नात्याला महिलेच्या आईचा विरोध असल्याचे बोलले जात आहे. तो अनेकदा महिलेच्या घरी भेटायला जात असे. काही दिवसांपासून त्यांच्यात कडाक्याचे भांडणं होत आहेत. 

आरोपी अशाच पद्धतीने महिलेकडे असताना, कपडे मागण्यावरून त्यांच्या वाद सुरू झाला. वाद इतक्या टोकाला पोहचला की, आरोपीने जवळचा चाकू घेऊन महिलेचा गळा चिरला. गळा चिरल्यामुळे महिला खाली कोसळली. त्यानंतर आरोपीने स्वतःच्या तोंडात सुतळी बॉम्ब फोडून आत्महत्या करण्याच प्रयत्न केला. 

हेही वाचा - मुलीच्या पावलांचे पूजन करून लक्ष्मीपूजन संपन्न; गावंड दांपत्याचा समाजापुढे आदर्श

आरोपीने महिलेला मारून स्वतः आत्महत्येच्या केलेल्या प्रयत्नामुळे दोन्ही जबर जखमी झाले होते. त्यांना कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याठिकाणी दोघांवर उपचार सुरू आहेत. आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bomb exploded in own mouth Shocking incident in Malad