esakal | बोंबील 100 रुपये किलो
sakal

बोलून बातमी शोधा

मासे स्वस्त झाले आहेत.

खोल समुद्रातील मासेमारीवरील बंदी संपुष्टात आली आहे. त्यामुळे मासेमारी जोरात सुरू आहे. माशांची आवक वाढली आहे; मात्र व्रतवैकल्याचा श्रावण माहिना सुरू असल्याने माशांची मागणी घटली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात बोंबील 100 रु. प्रति किलोने विकले जात आहेत. इतर माशांच्या किमतीही उतरल्या आहेत. 

बोंबील 100 रुपये किलो

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रोह : पंधारा दिवसांपूर्वी मासळीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले होते. पावसाळ्यातील मासेमारीवरील बंदी संपुष्टात आल्यानंतर ते 20 ते 30 टक्‍क्‍यांनी उतरले आहेत. त्यामुळे या बाजारात स्वस्ताई आली आहे. बोंबलांचा भाव प्रति किलो 100 रुपये झाला आहे. 

पावसाळा सुरू झाल्यानंतर खोल समुद्रातील मासेमारी बंद होती. त्यामुळे आवक कमी होती. त्यामुळे बहुतेक माशांचे भाव गगनाला भिडले होते. बोंबील तर 400 रुपये किलो होता.

आता खोल समुद्रातील मासेमारीवरील बंदी संपुष्टात आली आहे. त्यामुळे मासेमारी जोरात सुरू आहे. माशांची आवक वाढली आहे; मात्र व्रतवैकल्याचा श्रावण माहिना सुरू असल्याने माशांची मागणी घटली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात बोंबील 100 रु. प्रति किलोने विकले जात आहेत. इतर माशांच्या किमतीही उतरल्या आहेत. 

गेल्या महिन्यात पापलेट 800 रुपये किलो होते. ते आता 200 रुपयांनी कमी झाले आहे. हलवा, बांगडा आदी माशांचे भावही उतरले आहेत. 

खोल समुद्रातील मासेमारीवरील बंदी आता संपुष्टात आली असल्याने सर्व बोटींनी मासेमारी सुरू केली आहे. बाजारात मासळीची आवक वाढली असली तरी श्रावण महिना सुरू असल्याने मागणी घटली आहे. त्यामुळे मासळीचे दर सध्या उतरले आहेत. गणेशोत्सव संपेपर्यंत मासे स्वस्त असतील. 
- लक्ष्मीबाई वाडकर, मासळी विक्रेत्या, नागोठणे 

loading image
go to top