Adar Poonawala: अदर पुनावाला यांच्या अडचणीत वाढ; हायकोर्टाचा दिलासा देण्यास नकार

पुनावाला यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांचा दावा ठोकण्यात आला आहे.
Adar Poonawalla
Adar Poonawallaesakal

मुंबई : भारतातील अग्रगण्य औषध निर्मिती कंपनी सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अदर पुनावाला यांना तातडीनं दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिला आहे. कोरोना लसीच्या संदर्भात त्यांच्यावर १०० कोटींचा दावा ठोकण्यात आला आहे. (Bombay HC Refuses to Immediately Restrain in Serum Institute 100 Cr Defamation Suit)

सीरमनं तयार केलेल्या लसीचे आपल्या डॉक्टर मुलीवर गंभीर दुष्परिणाम झाले आणि त्यामुळं तिचा मृत्यू झाला असा दावा दिलीप झोरावत नामक एका व्यक्तीनं केला आहे. यामुळं झोरावत यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. त्यासाठी तिच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा ठपका ठेवत सीरम इन्स्टिट्यूट आणि अदर पुनावाला यांच्यावर १०० कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा हायकोर्टात ठोकला आहे.

Adar Poonawalla
Mukta Tilak : भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन

दरम्यान, पुनावाला यांनी हायकोर्टात आपल्यावरील आरोप फेटाळत या खटल्याला स्थिगिती देण्याची मागणी केली होती. पण हायकोर्टानं त्यांची मागणी फेटाळत तातडीनं दिलासा देण्यास नकार दिला. तसेच यावर लवकरच पुढील सुनावणी होईल, असंही सांगितलं. या प्रकरणात सीरम इन्स्टिट्यूट, अदर पुनावाला आणि सीरमचे भागीदार बिल गेट्स यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. तसेच गुगल, युट्यूब यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनंही लशींचे दुष्परिणाम दडवल्याचा आरोप करत या कटात सहभागी असल्याचा दावा केला आहे.

हे ही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com