अभिनेत्री कंगना राणावतला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

सुनीता महामुणकर
Wednesday, 9 September 2020

 कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीने याचिका दाखल केली आहे. याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली आहे.  दरम्यान कंगनाच्या कार्यालयावरील मनपानं आपली कारवाई तुर्तास थांबवली आहे.

मुंबईः कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीने याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली आहे.  अभिनेत्री कंगना राणावतला मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. कंगनाच्या पाली हिलच्या कार्यालयावरील कारवाईला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. मुंबई पालिकेच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायलयानं ताप्तुरती स्थगिती दिलीय. कंगनाच्या कार्यालयातील कथित अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने सुरू केलेली तोडक कारवाईला न्यायालयाने आज अंतरीम स्थगिती दिली.

उद्या दुपारी तीन वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. कंगना आणि मुंबई महापालिका दोघांनाही गुरुवारी बाजू मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

पाली हिल येथील निवासस्थानी असलेल्या कार्यालयात कंगनाने नियमबाह्य बांधकाम केले आहे असा दावा महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. यावर तिला एक नोटीस ही सोमवारी बजावण्यात आली. या नोटीसला २४ तासात उत्तर देण्याचे निर्देश पालिकेने दिले होते. त्यावर कंगनाच्या वतीने उत्तर देण्यासाठी सात दिवस मागितले होते. तसेच बांधकाम अनधिकृत नसल्याचा दावा तिचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी केला होता. मात्र असे असताना आज सकाळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रचंड पोलिस बंदोबस्त घेऊन तोडकाम सुरू केले. त्यामुळे भांबावलेल्या कंगनाने सिद्दीकी यांच्या मार्फत थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायाधीशांच्या दालनात व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी झाली तर सिद्दीकी यांनी कारमधून घटनास्थळी असताना हजेरी लावली.

 

दरम्यान सुनावणी आधीच कंगनाच्या कार्यालयावरील मनपानं आपली कारवाई तुर्तास थांबवली. कार्यालयाच्या तळमजल्यावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. न्यायालयात सुनावणीपर्यंत कारवाई थांबवण्यात आली. कार्यालयाच्या आत कारवाई करणारे कर्मचारी घराबाहेर पडले. कंगनाच्या कार्यालयावर तब्बल दीड तास कारवाई केली. सर्व साहित्या घेऊन कर्मचारी घराबाहेर पडले.

------------

(संपादनः पूजा विचारे)

Kangana office BMC officials demolition case heard in Mumbai High Court


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bombay High Court stays Kangana office BMC officials demolition case