esakal | बोरीवलीत इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग
sakal

बोलून बातमी शोधा

बोरीवलीत इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग

बोरीवलीत इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - बोरीवलीत गांजावाला इमारतीच्या सातव्या मजल्याला भीषण आग लागली आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ४ गाड्या पोहोचल्या आहेत. अग्निशामक विभागाचे कर्मचाऱी शिड्यांचा वापर करून अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढलं जात आहे.

इमारतीला आग लागल्यानंतर शेजारीच असलेला पेट्रोल पंप बंद करण्यात आला आहे. सातव्या मजल्यावर भडकलेली आग मोठी असून अग्निशमन दलाचे कर्मचारी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अद्याप आग कशामुळे लागली आणि किती लोक अडकले आहेत याची माहिती मिळू शकली नाही.

loading image
go to top