esakal | मित्रांच्याच डोक्यात फोडली बीयरची बाटली; किरकोळ वादामुळे दारू पिऊन इतर मित्रांनाही मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

मित्रांच्याच डोक्यात फोडली बीयरची बाटली; किरकोळ वादामुळे दारू पिऊन इतर मित्रांनाही मारहाण

वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीमध्ये किरकोळ कारणावरून एका व्यक्तीने आपल्याच मित्रांच्या डोक्‍यामध्ये बीयरची बाटली मारल्याची घटना रविवारी पहाटे नेरूळमध्ये घडली.

मित्रांच्याच डोक्यात फोडली बीयरची बाटली; किरकोळ वादामुळे दारू पिऊन इतर मित्रांनाही मारहाण

sakal_logo
By
विक्रम गायकवाड

नवी मुंबई  : वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीमध्ये किरकोळ कारणावरून एका व्यक्तीने आपल्याच मित्रांच्या डोक्‍यामध्ये बीयरची बाटली मारल्याची घटना रविवारी पहाटे नेरूळमध्ये घडली. याप्रकरणी शंकर पडवळ (37) याच्यावर नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

महादेव फुंदे हा नेरूळ सेक्‍टर- 16 मध्ये राहत असून इस्टेट एजंटचे काम करतो; तर त्याच्यावर हल्ला करणारा त्याचा मित्र शंकर पडवळ हा कोपरखैरणेत राहत असून त्याचा टूर्स ऍण्ड ट्रव्हल्सचा व्यवसाय आहे. शनिवारी शंकरकडे काम करणाऱ्या चालकाचा वाढदिवस असल्याने आयोजित केलेल्या पार्टीत महादेवलाही बोलावले होते. सायंकाळी 7 वाजता महादेव वाशीतील हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला. या वेळी शंकरसह त्याचे सहा-सात मित्र दारू पिऊन आग्रोळी येथील बारमध्ये गेले. या ठिकाणी झालेल्या किरकोळ वादातून शंकरने चालकाला मारण्यासाठी खुर्ची उचलली.

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

महादेवने त्याला अडवले असता शंकरने बीयरची बाटली महादेवच्या डोक्‍यात मारली. त्यानंतर आणखी दोन मित्रांना मारहाणी केली. याप्रकरणी नेरुळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी शंकर पडवळविरोधात गुन्हा दाखल केला; मात्र अद्याप त्याला अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
A bottle of beer smashed on friends happened in nerul navi mumbai

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )