मुंबई - विनयभंगातील तक्रारदार महिलेच्या डोक्यात बाटली फोडणा-या मुख्य आरोपीचा शोधासाठी सध्या शिवाजी नगर पोलिसांनी विशेष पथक स्थापन केले आहे. तक्रारदार महिलेने आरोपीविरोधात गेल्यावर्षी विनयभंगाची तक्रार केली होती. त्याचा सूड घेण्यासाठी आरोपीने हे कृत्य केले. आरोपीच्या मित्रानेही तिच्या 16 वर्षीय भागावर हल्ला केला. त्या पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी व तक्रारदार तरूणी एकाच परिसरातील राहणारे आहेत. तक्रारदार तरूणीचे वडील आखाती देशात कामाल आहेत. ती इतर कुटुंबियांसमवेत शिवाजी नगर परिसरात राहते. गेल्यावर्षी तरुणी 17 वर्षाची असताना आरोपीने तिचा विनयभंग केला होता. त्याच्या रागातून नुकतीच आरोपीने तरुणी व तिच्या भावासोबत भांडण केले. तरुणीने केलेल्या तक्रारीमुळे आरोपी संतापला होता. त्यात त्याने तिच्या डोक्यावर दारुची बाटली मारली. त्याच्या मित्राने तरुणीच्या भावाला मारहाण केली. त्यानंतर धमकावून पलायन केले. स्थानिकांच्या मदतीने जखमी तरूणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपीविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. त्याच्या मित्राला अटक करण्यात आली असून पाच जानेवारीपर्यंत त्याला पोलिस कोठडीच आहे.
A bottle smashed into the head of a woman who complained of Abuse The main accused passed
----------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.