esakal | Breaking | पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा
sakal

बोलून बातमी शोधा

Breaking | पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

विरोधकांच्या प्रचंड टीका आणि दबावानंतर आज (रविवारी) वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे

Breaking | पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई -  गेल्या काही दिवसांपूर्वी टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने पुणे येथे आत्महत्या केली होती. तिचे वनमंत्री संजय राठोड यांच्याशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. तसे आरोपही त्यांच्यावर केले आहे. संजय राठोड यांचा कार्यकर्ता अरुण राठोडला याप्रकरणी ताब्यात घेतले होते. तसेच पूजा चव्हाणचे नाव बदलून पूजा राठोड या नावाने यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गर्भपात केल्याचेही बोलले जात आहे. याप्रकरणी अनेक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर विरोधी पक्षाने संजय राठोड यांच्यावर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. इतके आरोप होत असताना संजय राठोड हे जवळपास दहा ते पंधरा दिवस माध्यमांच्या समोर आले नाहीत. त्यानंतर माध्यमासमोर येऊन त्यांनी माझ्या समाजाची आणि कुटुंबाची बदनामी करू नका, असे म्हटले होते. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा

दरम्यान, दररोज वेगवेगळे आरोप होत असल्याने महाविकास आघाडीमधील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा राजीनाम्यासाठी सेनेवर दबाव असल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तसेच पक्षाची बदनामी होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील संजय राठोड यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

विरोधकांच्या प्रचंड टीका आणि दबावानंतर आज (रविवारी) वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. राठोड यांच्यावर पक्षांतर्गत सुद्धा दबाव वाढला होता. राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री कधी स्विकारणार याकडे आता महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

loading image