ब्रेकिंग! रिया चक्रवतीचा भाऊ शौविक आणि मिरांडाला एनसीबीडून अटक

अनिश पाटील
Friday, 4 September 2020

रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सुशांतचा मॅनेजर सम्युल मिरांडा या दोघांना केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी विरोधी पथकाने (एनसीबी)अटक केली . ड्रग्स विकत घेणे, वापरणे आणि इतरांना देणे या आरोपांखाली दोघांना अटक केली. या प्रकरणात रियाची ही चौकशी केली जाणार आहे

मुंबई  - सुशांतसिंग राजपूत प्रकरणामध्ये केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या(एनसीबी) कारवाईला गती प्राप्त झाली असून याप्रकरणी अटक केलेल्या ड्रग्ज तस्करांच्या चौकशीतुन रियाचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांची नावे पुढे आले आहेत. त्यामुळे एनसीबीने या दोघांना ताब्यात घेत कसुन चौकशी केली. त्याचप्रमाणे, रिया आणि शौविकचे देखील ड्रग्ज चॅट एनसीबीच्या हाती लागल्याने, रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सुशांतचा मॅनेजर सम्युल मिरांडा या दोघांना केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी विरोधी पथकाने (एनसीबी)अटक केली . ड्रग्स विकत घेणे, वापरणे आणि इतरांना देणे या आरोपांखाली दोघांना अटक केली. या प्रकरणात रियाची ही चौकशी केली जाणार आहे

एनसीबीच्या पथकाने शुक्रवारी सकाळी रिया चक्रवर्तीच्या प्राइम रोज अपार्टमेन्ट आणि सॅम्युअल मिरांडाच्या घरी छापा टाकला. अमली पदार्थांच्या देवाण-घेवाणीमध्ये शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअलचे नाव समोर आले होते. यानंतर एनसीबीच्या पथकाने दोघांच्या घरी छापा टाकला. जवळपास तीन तास शौविकच्या घरी शोध मोहीम सुरू होती. त्यानंतर एनसीबीने शौविकला चौकशीचे समन्स देत त्याची तत्काळ चौकशी करण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे मिरांडाच्या घरी दोन तास चाललेल्या शोध मोहिमेनंतर त्याला ताब्यात घेण्यात आले असुन, या दोघांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान, एनसीबीने अटक केलेल्या ड्रग्ज तस्करांसी सबंध असल्याचे शौविकने कबुल केल्याची सूत्रांनी सांगितले.

 तर यापुर्वी अटक करण्यात आलेले ड्रग्ज तस्कर झेद विलात्रा आणि अब्दुल बासित परिहार यांच्याकडून शौविक आणि सॅम्युअलचे नाव समोर आले होते. त्यानंतर एनसीबीने  शुक्रवारी सकाळी रिया आणि सॅम्युअलच्या घरी शोध मोहिम राबवली. यादरम्यान, शौविकचा लॅपटॉप देखील एनसीबीने ताब्यात घेतला आहे. वॉट्सअॅप चॅटमधुन शौकीत आणि अटक केलेला ड्रग्ज तस्कर अब्दुल बासित परिहार यांचे जवळचे संबध असल्याचे समोर आले आहे. हे दोघे ऐकमेकांच्या घरी सातत्याने ये-जा करीत होते. त्याचप्रमाणे, शौविक आणि अब्दुल बासित परिहार एका फुटबॉल क्लबमध्ये भेटले. तेथेच अब्दुलने शौविक आणि झैदची ओळख करून दिली. यानंतर शौविकनेच झैद आणि सॅम्युअल मिरांडाची ओळख करून दिली. त्यानंतर यांच्यात ड्रग्जची देवाण-घेवाण सुरु झाली. शौविक, झैद आणि अब्दुलकडुन ड्रग्ज घेऊन तो सॅम्युअल मिरांडाच्या घरी ठेवत होता. त्यानंतर तो रियाला देत असल्याचे समोर आले आहे.
.....
रिया आणि शौविकचे व्हॉट्सअॅप चॅट
  रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती या दोघांमधली व्हॉट्सअॅप चॅट समोर आले आहे. या चॅटमध्ये रिया आपला भाऊ शौविक चक्रवर्तीकडे ड्रग्जची मागणी करत आहे. रिया यामध्ये एका तिस-या व्य्ाक्तीचाही उल्लेख करत आहे. रिया म्हणत आहे की, तो दिवसातून चार वेळा सिगारेट पितो, त्या अंदाजाने प्लान कर. त्यानंतर शौविक तिला म्हणतो की, आणि बड्स, त्याला पाहिजे? रिया म्हणते, हो बडसुद्धा. त्यानंतर शौविक म्हणतो की, मी 5ग्रॅम बडची व्यवस्था करू शकतो, यापासून 20 सिगरेट तयार होतात. या चॅटच्या माध्यमातून एनसीबीला महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे शौविक आणि मिरांडाला अटक करण्यात आली आहे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breaking! Riya Chakraborty, Shauvik and Miranda arrested by NCB