esakal | #AareyForest आरेत 2000 झाडे तोडली 
sakal

बोलून बातमी शोधा

tree.jpg

आरे वसाहतीतील दोन हजारच्यावर झाडे आतापर्यंत कापण्यात आली आहे .गेल्या 30 तासाहून जास्त काळ ही वृक्ष कापणी सुरु आहे.

#AareyForest आरेत 2000 झाडे तोडली 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आरे वसाहतीतील दोन हजारच्यावर झाडे आतापर्यंत कापण्यात आली आहे .गेल्या 30 तासाहून जास्त काळ हि वृक्ष कापणी सुरु आहे.

शुक्रवार रात्री पासून मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पेारेशनने मेट्रेाच्या कारशेड मध्ये अडथळा ठरणारी झाडे कापण्यास सुरुवात केली. तेव्हा पासून आरेच्या परीसराती वातावरण चिघळले  .पोलिसांनी शनिवारी या परीसरात जमाव बंदी लागू केली आहे .300 हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले होते तर 28 जणांना अटक करण्यात आली.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्यांमध्ये विद्यार्थांचा समावेश असून, उद्या त्यांची परीक्षा आहे. त्यांच्या पालकांनी विनंती करुनही त्यांची सुटका करण्यात आली नाही. त्यामुळे आज दुपारी या विद्यार्थांचे पालक पत्रकार परीषद घेणार आहेत. 

तसेच आरेतील वृक्षतोडीला विरोध करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आरे वसाहतीत पोहचले होते. याठिकाणी कलम 144 लागू असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.