अंगावरचे दूध पिणाऱ्या बाळाचा ताबा आईकडेच; वडिलांचा दावा सत्र न्यायालयात नामंजूर 

सुनिता महामुणकर
Monday, 9 November 2020

आईचे दूध पिणाऱ्या दोन वर्षांच्या बाळाचा ताबा वडिलांकडे देण्यास सत्र न्यायालयाने नकार दिला आहे.

मुंबई : आईचे दूध पिणाऱ्या दोन वर्षांच्या बाळाचा ताबा वडिलांकडे देण्यास सत्र न्यायालयाने नकार दिला आहे. जर बाळाला त्याच्या आईपासून दूर ठेवले तर त्याला डांबून ठेवल्यासारखे होईल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. बाळाला हजर करण्यासाठी सर्च वॉरंट जारी करण्याचे निर्देश न्यायालयाने दंडाधिकारी न्यायालयाला दिले आहेत. 

अर्णब गोस्वामी यांच्या पुनर्निरीक्षण याचिकेवर मंगळवारी सुनावणी; पोलिसांना दररोज तीन तास चौकशीला परवानगी

पश्‍चिम उपनगरात राहणाऱ्या एका महिलेने मुलाचा ताबा मिळावा म्हणून सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वाद झाल्यामुळे पतीने तिला घराबाहेर काढले. मात्र, दोन वर्षांच्या बाळाला तिच्याकडे देण्यास नकार दिला. बाळाचा ताबा मिळावा म्हणून तिने दंडाधिकारी न्यायालयात याचिका केली होती; परंतु तिची मागणी दंडाधिकारी न्यायालयाने अमान्य केली. त्यामुळे तिने सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला.

बाळ दोन वर्षांचे असून ते अंगावरचे दूध पीत असल्याने त्याचा ताबा द्यावा, पतीने जबरदस्तीने त्याला ताब्यात घेतले आहे आणि सध्या तो बंगळुरूमध्ये आहे, असा युक्तिवाद आईच्या वतीने करण्यात आला. मात्र, पतीकडून तिच्या मागणीला विरोध करण्यात आला. वडीलही मुलाचे नैसर्गिक पालक असतात. त्यामुळे बाळाचा ताबा वडिलांकडे राहू शकतो, असा दावा त्यांनी केला. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद अमान्य केला. दंडाधिकारी न्यायालयाने आईची बाजू समजून घ्यायला हवी होती, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. बाळाला हजर करण्यासाठी सर्च वॉरंट तातडीने जारी करण्याचे आदेश न्यायालयाने दंडाधिकारी न्यायालयाला दिले आहेत. 

कल्याण रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, रेल्वे प्रशासनाचा निर्णयZ

फौजदारी दंड संहिता कलम 97 नुसार पाच वर्षांपर्यंतच्या मुलाचा ताबा कायद्याने आईकडे असतो, अशा तरतुदींचा दाखला पत्नीकडून देण्यात आला

breastfed baby stay with mother Fathers claim denied in Sessions Court

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: breastfed baby stay with mother Fathers claim denied in Sessions Court