सहायक आयुक्तावर लाचप्रकरणी गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

मुंबई - मूल्यवर्धित कर (व्हॅट) परताव्यातील दोषांप्रकरणी मदत करण्याच्या नावाने दोन कोटींची लाच मागणारे सहायक राज्य कर आयुक्त सोपान रामभाऊ सूर्यवंशी आणि माजी विक्रीकर उपायुक्त डी. व्ही. रेठरेकर या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली. मॅकनेली भारत इंजिनिअरिंगच्या नागपूर येथील कार्यालयावर राज्य कर विभागाच्या पथकाने सप्टेंबर 2016 मध्ये भेट दिली होती. त्या वेळी सूर्यवंशी सहायक म्हणून कार्यरत होते. कंपनीच्या 2011 ते 2016 च्या व्हॅट परताव्यात दोष काढून त्यांच्या कंपनीला तीन कोटी 55 लाखांचा अतिरिक्त कर लावण्यात आला. त्या वेळी कंपनीचे सल्लागार डी. व्ही. रेठरेकर (माजी विक्रीकर उपायुक्त) यांनी कंपनीला कर भरण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तो भरण्यात आला. त्यानंतर नोव्हेंबर 2017 मध्ये कंपनीच्या उपाध्यक्षांकडे रेठरेकर यांच्यामार्फत सूर्यवंशी यांनी अन्वेषण विभागाच्या भेटीदरम्यान केलेल्या मदतीकरिता दोन कोटींची मागणी केली. 

Web Title: Bribery case against assistant commissioner