अंधेरी स्थानकावर पुलाचा भाग कोसळला; पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

संतोष मोरे
मंगळवार, 3 जुलै 2018

प्रवाशांच्या सोईसाठी दहिसर आणि बोरिवलीदरम्यान वाहतूक सुरू करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार कमीतकमी ५ तास तरी पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत होऊ शकणार नाही. या दुर्घटनेमुळे वांद्रे, दादर आणि मुंबई सेेंट्रलवरून सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळात बदल करण्यात येणार आहे.

मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलावरील पादचाऱ्यांसाठी राखीव भाग आज (मंगळवार) सकाळी कोसळला. पुलाचा ढिगारा कोसळत असताना सहाच्या सहा मार्गिकांवरील ओव्हरहेड वायर तुटल्या आहेत. त्यामुळे अप आणि डाऊन दिशेची वाहतूक ठप्प झाली आहे. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रवाशांच्या सोईसाठी दहिसर आणि बोरिवलीदरम्यान वाहतूक सुरू करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार कमीतकमी ५ तास तरी पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत होऊ शकणार नाही. या दुर्घटनेमुळे वांद्रे, दादर आणि मुंबई सेेंट्रलवरून सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळात बदल करण्यात येणार आहे.

मुंबईत आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. सकाळी साडेअाठपर्यंत १३१.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पुलाचा भाग कोसळल्यानंतर अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, पुलाचा भाग हटविण्याचे काम सुरु आहे. 

Web Title: bridge collapsed in Andheri station Mumbai western railway line