
विरार ः पश्चिम रेल्वेवरील नायगाव स्थानकातील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उड्डाणपुलाचे काम रखडल्याने येथील नागरिकांना प्रवासावेळी अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या मे महिन्यात पूर्ण होणारा हा उड्डाणपूल अद्यापही रखडलेला आहे. नायगाव पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा मार्ग नसल्याने याठिकाणी रेल्वेवर उड्डाणपूल उभारण्याची मागणी नागरिक करत होते. पूर्वेकडून पश्चिमेला प्रवास करायचा झाल्यास 20 किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता. त्यामुळे याठिकाणी उड्डाणपूल व्हावा यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, माजी महापौर नारायण मानकर यांच्या पाठपुराव्याने हा पूल सर्व परवानग्या घेऊन मंजूर झाला. 2013 साली या पुलाचे काम सुरू झाले. दरम्यानच्या काळात पश्चिमेकडील पुलावरील गर्डर कोसळले. त्यानंतर गेल्या महिन्यापासून पुलाचे रेल्वे स्थानक परिसरातील पिलरचे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना ते अपूर्णच आहे. आता या कामासाठी असलेला ठेकेदार कामचुकारपणा करत असल्याने अखेर रेल्वेने याकामासाठी नव्याने ठेकेदराची नेमणूक केली आहे. त्यामुळे आता हे काम मे 2021 मध्ये पूर्ण होणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.
हा उड्डाण पूल तयार झाल्यास नायगाव पूर्वेकडील नागरिकांना पश्चिमेकडे जाणे सोपे होणार आहे. तसेच वसई पश्चिमेच्या नागरिकांना महामार्गावर येण्यासाठी जवळपास वीस किलोमीटरचा वळसा घालण्याची गरज भासरणार नाही. त्यामुळे आता हे काम वेळेत पूर्ण होते का याकडे वसई, नायगावमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
...तर काम पूर्ण-
आरपीएस इन्फ्रा प्रोजेक्टकडून उर्वरित नायगाव पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले. रेल्वेकडून योग्य सहकार्य मिळत राहिले तर जून महिन्याच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण करणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही उड्डाणपुलाची मागणी करत होतो. आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी महापौर नारायण मानकर यांच्या माध्यमातून या पुलासाठीच्या साऱ्या परवानग्या उपलब्ध करून दिल्या होत्या. असे असतानाही या पुलाचे काम मात्र रखडले होते. परंतु, आता हे काम लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
- मनीष वर्तक, माजी नगरसेवक
Bridge over Naigaon railway blocked; Appointment of a new contractor, the work will be completed by the end of May
------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.