
राज्यातल्या लोककलांचा इतिहास, जडणघडण, लोककलांचे पूर्वीचे आणि आजचे स्वरूप यावर प्रकाश टाकणारी "लोककला रंग' ही संवाद मालिका सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या फेसबुक पेज आणि यू-ट्युब वाहिनीवरून प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.
मुंबई : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत इथल्या मातीचा सुगंध असलेल्या अस्सल लोककलांचे महत्त्वाचे योगदान आहे. शेकडो वर्षांची लोकप्रबोधनाची आणि लोकरंजनाची परंपरा असलेल्या राज्यातल्या लोककलांचा इतिहास, जडणघडण, लोककलांचे पूर्वीचे आणि आजचे स्वरूप यावर प्रकाश टाकणारी "लोककला रंग' ही संवाद मालिका सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या फेसबुक पेज आणि यू-ट्युब वाहिनीवरून प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने "लोककला रंग' ही संवाद मालिका 4 ते 11 जानेवारीपर्यंत रोज संध्याकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई या फेसबुक पेज आणि यू-ट्युब वाहिनीवर प्रसारित होईल. लोककलांचे अभ्यासक डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या सर्व लोककलांचा थोडक्यात परिचय करून देणाऱ्या प्रस्तावनेने या मालिकेची सुरुवात होणार आहे. सुप्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, शाहीर देवानंद माळी, लावणी सम्राज्ञी रेश्मा परितेकर, प्रसिद्ध कीर्तनकार डॉ. दिलीप डबीर, भारुडकार निरंजन भाकरे, गोंधळकार भारत कदम, खडीगंमत अभ्यासक मनोज उज्जैनकर आणि दशावतार कलाकार सुधीर कलिंगण हे मान्यवर आपल्या कलेचे मर्म प्रात्यक्षिकांसह उलगडणार आहेत. ज्येष्ठ निवेदक नरेंद्र बेडेकर कलाकारांशी संवाद साधणार आहेत. कलारसिकांना या संवाद मालिकेचा आपापल्या घरी बसून आस्वाद घेता येईल, तरी संचालनालयाच्या फेसबुक पेज व यू-ट्युब वाहिनीवरून या मालिकेचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
Broadcast of a series of dialogues unfolding the essence of folk art from Monday
---------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )