उल्हासनगरमध्ये सैराट... भाऊजीला घातल्या गोळ्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

बहिनीचा आतर्धर्मीय विवाह नामंजूर असल्याने भाऊजीच्या डोक्‍यात गोळी झालून हत्या करणाऱ्या मेहूण्याला पोलिसांनी अटक केली.

उल्हासनगर : बहिनीचा आतर्धर्मीय विवाह नामंजूर असल्याने भाऊजीच्या डोक्‍यात गोळी झालून हत्या करणाऱ्या मेहूण्याला पोलिसांनी अटक केली. गेल्या दोन महिन्यापासुन आरोपी विठ्ठलवाडी पोलिसांना गुंगारा देत होता. 
4 नोव्हेंबरच्या रात्री सर्टिफाइड शाळेच्या जवळ आणि प्रज्ञा करुणा मुकबधीर विद्यालयाच्या पटांगणात एक टोळके नशा करीत बसले होते. या टोळक्‍यात भरत चंद्रकांत लष्कर हा त्याचा मित्र आनंद राजू सोनावणे याच्या बसला होता. त्यावेळी कृष्णा कुंभार, अभिजीत बोडके, अल्ताफ शेख, सिद्धार्थ पासवान आणि उदय भाटकर हे पाच जण मोटरसायकलवर आले.

त्यानंतर अल्ताफ शेख याने त्याच्या जवळच्या पिस्तूलाने भरतच्या डोक्‍यात गोळी झाडली. त्यानंतर सिद्धार्थ पासवानने याने खाली कोसळलेल्या भरतचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. जखमी भरत याचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कृष्णा कुंभार, उदय भाटकर आणि अभिजीत बोडके उर्फ कलरला अटक केली. मात्र अल्ताफ हा विठ्ठलवाडी पोलिसांना गुंगारा देत होता. 

ही बातमी वाचा ः  बापरे ! राज्यात दररोज 30 मुलांचे अपहरण, यामध्ये मुलींचे प्रमाण...
त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक गुन्हे नंदलाल खडकीकर याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक हर्षल राजपूत हे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या मदतीने तपास करीत होते. मात्र अल्ताफ शेख हा ठिकाण बदलत होता. तसेच तो फेसबुक कॉलिंगच्या माध्यमातून संपर्क साधत असल्याने त्याचा ठावठिकाणा लावणे कठीण होत होते. मुंबई, गुजरात, जयपूर, उत्तर प्रदेश, नेपाळ, कलकत्ता, हेद्राबाद असा पोलीस त्याचा मागोसा घेत होते. पण प्रत्येक ठिकाणी तो निघून गेल्यावर पोलीस पथक पोहचत असल्याने अपयश हाती येत होते. 

फेसबुक फेंडच्या मदतीने आरोपीला पकडले 
मागील पंधरा दिवसापासून विठ्ठलवाडी पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे अल्ताफला पोलिसांनी आपला पिच्छा सोडला असे वाटले. याचाच फायदा घेत विठ्ठलवाडी पोलिसांनी त्याच्या फेसबुक फ्रेंडच्या माध्यमातून त्याला पुणे येथे भेटण्यासाठी आमंत्रित केले. त्यामुळे हैद्राबाद वरून थेट पुणे गाठत भेट घेतली. त्यावेळी पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांसह विठ्ठलवाडी पोलीसांनी अल्ताफला मित्रासोबत ढाब्यावर जेवण करत असताना अटक केली. दरम्यान बहिनीने अंतरधर्मीय लग्न केल्याच्या रागातून भाऊजीची हत्या केल्याची कबूली आरोपी अल्ताफ शेख याने दिली. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brother kills sister's husband for interfaith marriage