
उल्हासनगर - बीएसपीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच मुंबई व कोकण विभागाचे लोकसभा इंचार्ज डॉ. प्रशांत इंगळे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, त्यांनी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते काँग्रेसच्या हातात हात दिला दिला आहे.
यावेळी खासदार इमरान प्रतापगडी व खासदार मुकूल वासनिक उपस्थित होते. काँग्रेसचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.