10 महिन्यात लोअर परळ पूल उभारा

संतोष मोरे
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मुंबई : 23 धोकादायक लोअर परळच्या पूलाच्या उभारणीबाबत रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी तोडगा काढला आहे. लोअर परळ पूलाचे पाडकाम सध्या सुरु आहे. येत्या दहा महिन्यात पूल उभारण्याच्या सूचना रेल्वेमंत्री रेल्वे आणि महापालिकेला केल्या आहेत. 

मुंबई : 23 धोकादायक लोअर परळच्या पूलाच्या उभारणीबाबत रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी तोडगा काढला आहे. लोअर परळ पूलाचे पाडकाम सध्या सुरु आहे. येत्या दहा महिन्यात पूल उभारण्याच्या सूचना रेल्वेमंत्री रेल्वे आणि महापालिकेला केल्या आहेत. 
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी गेल्या आठवडयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या पुलाचे काम कालबब्ध पद्धतीने करण्यात यावे, अशी मागणी केली होती. या शिष्टमंडळाने रेल्वे मंत्री गोयल यांनी स्पष्ट केले की, लोअर परळ पूलाचा आराखडा रेल्वे तयार करणार असून महापालिकेच्या हद्दीतील पुलाचे काम महापालिका आणि रेल्वे हद्दीतील काम रेल्वे करणार आहे.

बैठकीत झालेल्या चर्चेनूसार, लोअर परळ पूलाचे पाडकाम सध्या सुरु आहे. लोअर परळ पूलाचा आराखडा रेल्वेने तयार करावा. तीन महिन्यात पूलाचे पाडकाम पूर्ण करा तसेच आराखड्यानूसार रेल्वे हद्दीतील भाग रेल्वेने आणि महापालिका हद्दीतील भाग महापालिकेने उभारावा, असा निर्णय घेण्यात आला. एकूण 10 महिन्यांत रेल्वे आणि महापालिका यांनी समन्वय साधून पूल उभारावा, अशा सूचना रेल्वेमंत्री यांनी रेल्वे आणि महापालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. 

दक्षिण मुंबईतील वाहतूकीसह पादचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला लोअर परळ पूल आयआयटीच्या नेतृत्वाखालील पथकाने धोकादायक ठरवला होता. लोअर परळ पूलाचे पाडकाम पश्चिम रेल्वे करत असून पूल उभारण्याबाबत रेल्वे आणि महापालिका यांच्यात एकमत होत नव्हते. यामुळे अखेर गुरुवारी झालेल्या बैठकीत लोअर परळ पूलाच्या उभारणीबाबत तिढा यशस्वीपणे सोडण्यात आला. 

Web Title: Build Lower Parel bridge in 10 Months