esakal | बिल्डर निशांत कदम हत्या प्रकरण ; आत्तापर्यंत 10 आरोपी अटकेत
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

बिल्डर निशांत कदम हत्या प्रकरण ; आत्तापर्यंत 10 आरोपी अटकेत

sakal_logo
By
विजय गायकवाड : सकाळ वृत्तसंस्था

नालासोपारा: विरार पूर्व फुलपाडा-सहकार नगर परिसरात सोमवार ता 06 रोजी निशांत कदम या बिल्डर ची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. ही हत्या जुन्या भांडणाच्या वादातून, दारूच्या पार्टीत कट रचून केली असल्याचे प्राथमिक तपासात निःपन्न झाले आहे. या प्रकरणात 14 च्या वर आरोपीचा समावेश असून, विरार आणि गुन्हे प्रकटीकरण युनिट 03 च्या पोलिसांनी संयुक्त कारवाही करत मागच्या 4 दिवसात 10 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर इतर 4 आरोपी आणखी फरार आहेत.

फरार आरोपींची ओळख पटली असून त्या आरोपी मध्ये राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींचा समावेश असल्याचे बोलल्या जात आहे. मात्र पोलिसांकडून याला दुजोरा मिळाला नसल्याने हत्याकांडातील सर्व आरोपी पकडल्याच्या नंतरच सर्व खुलासे समोर येणार आहेत.

चंद्रकांत चौहान, रोशन तिवारी, अजय शिरसाठ, कैलाश शिरसाठ, प्रकाश राठोड, सब्बास सेख (वय 31), अभय शिट्टी (वय 27), अजित सालवे (वय 27) अभिषेक राणा (वय 31), हामीद सेख (वय 39) असे अटक करण्यात आलेल्या 10 आरोपींची नाव आहेत. रविवारी रात्री या आरोपीना दारूच्या पार्टीत कट रचून, सोमवारी पहाटे तीन ते साडे तीन च्या सुमारास निशांत कदम या बिल्डर वर लोखंडी रॉड, धारदार हत्याराने वार करून फरार झाले होते.

हेही वाचा: VIDEO : तहसिलदारांच्या रिकाम्या खुर्चीलाच गाऱ्हाणे; सामाजिक कार्यकर्त्यांचा अनोखा फंडा!

हत्येच्या घटनेनंतर मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या आदेशाने, परिमंडळ 03 चे पोलीस उपायुक्त प्रशांत वागुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, विरार चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, गुन्हे प्रकटीकरण युनिट 03 चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र टीम आरोपींच्या तपासासाठी रवाना केल्या होत्या.

विरार पोलिसांनी दोन दिवसात 6 तर युनिट 03 ने 2 दिवसात 4 असे 10 आरोपिंच्या मुसक्या आवळल्यात यश मिळविले आहे. हे सर्व आरोपी वसई, विरार, नालासोपारा, चेंबूर परिसरातून पकडले आहेत. आणखी यात काही आरोपींचा समावेश असल्याचा निष्पन्न होतंय, त्यांची ओळख ही पाठविण्यात आली आहे. आणि ते आरोपीची आम्ही लवकरच पकडू असा विश्वास विरार चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा तापासाधिकारी सुरेश वराडे यांनी 'सकाळ' शी बोलताना सांगितले आहे.

loading image
go to top