कर्जाच्या ओझ्याने कुटुंबच खचून गेलंय; आता फेडायचे तरी कसं

निलेश मोरे
Thursday, 2 April 2020

लॉकडाऊनमुळे सामान्य जीवन विस्कळीत झाले. हातावर पोट भरणाऱ्यांची उपासमारी सुरू झाली आहे. तर, कर्ज घेऊन व्यवसाय करणाऱ्या सामान्यांची झोपच उडाली आहे. लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बंद असल्याने पैशांची आवक जवळपास थांबली आहे. दुसरीकडे, बॅंकेतून कर्ज घेतल्याने महिन्याचा इएमआय भरायचा कसा, या चिंतेने त्यांना ग्रासले आहे. 

घाटकोपर : लॉकडाऊनमुळे सामान्य जीवन विस्कळीत झाले. हातावर पोट भरणाऱ्यांची उपासमारी सुरू झाली आहे. तर, कर्ज घेऊन व्यवसाय करणाऱ्या सामान्यांची झोपच उडाली आहे. लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बंद असल्याने पैशांची आवक जवळपास थांबली आहे. दुसरीकडे, बॅंकेतून कर्ज घेतल्याने महिन्याचा इएमआय भरायचा कसा, या चिंतेने त्यांना ग्रासले आहे. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भीमनगरच्या काजरोलकर सोसायटीत राहणारे मधुकर हिरे ( 44 ) यांचा चप्पल दुरुस्तीचा व्यवसाय आहे. गेल्या 15 वर्षांपासून ते हा व्यवसाय करतात. पत्नी व दोन मुलांसह ते राहतात. वर्षभरापूर्वी त्यांनी जनकल्याण बॅंकेतून घरबांधणीसाठी तीन लाखांचे कर्ज घेतले. व्यवसायातून महिन्याला त्यांना जवळपास 15 हजार रुपये मिळतात. यातून 5 हजारांचा इएमआय ते भरत. उरलेल्या पैशातून मुलांचे शिक्षम, घरपट्टी, राशन भागवतानाच त्यांची दमछाक होते. त्यात लॉकडाऊनमुळे गेल्या 12 दिवसांपासून त्यांचा व्यवसाय पुर्णपणे बंद आहे. मधुकर हे घरात एकटेच कमावते. त्यामुळे संपुर्ण कुटुंबाचा भार त्यांच्याच खांद्यावर आहे. आर्थिक ओढाताणीमुळे त्यांनी गेल्या महिन्याचा हफ्ता भरण्यासाठी बॅंकेला दिलेला चेकही बाऊन्स झाला. तो हफ्ता भरण्यासाठी जनकल्याण बॅंकेतून फोन येत आहेत; मात्र, सध्या कमाईच बंद झाल्याने कर्जाचा हफ्ता आणि घरखर्च भागवायचा कसा, या प्रश्‍नांनी झोप येत नसल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत अख्खे कुटुंबच खचून गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

चप्पल दुरुस्ती हा आमचा परंपरागत व्यवसाय आहे. चर्मकार समाजाची ती एक कलाच आहे. हातावर पोट भरून आम्ही दिवस ढकलतो. महिनाभर व्यवसाय बंद राहणार असल्याने खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आधीच कर्ज असल्याने पुन्हा घर खर्च भागवण्यासाठी दुसरे कर्ज घेता येत नाही. यापुढे दिवस कसे ढकलायचे हा मोठाच प्रश्‍न आहे. 

- मधुकर हिरे, चर्मकार 

चर्मकार समाज हा आज कमावतो आणि आजच खर्च करतो. वाडवडिलांपासून अशी परंपरा सुरू आहे. लॉकडाऊनमुळे या समाजाचे उदरनिर्वाहाचे साधनच हिरावून घेतले आहे. सरकारने त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा व कायम नोकरीचा विचार करावा. 
- पांडुरंग कांबळे, नवी मुंबई चर्म कला सेवा संघ (संस्थापक/अध्यक्ष )

 

The burden of debt on family alone corona lockdown
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The burden of debt on family corona lockdown