मुंबईत तस्करीसाठी आणलेली हरणाची शिंगे जप्त, कुर्ल्यातून आरोपी अटकेत

मिलिंद तांबे
Tuesday, 23 February 2021

वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोने धडक कारवाई करत तस्करीसाठी आणलेली हरणाची शिंगे जप्त केली. या प्रकरणी एका आरोपीची धरपकड ही करण्यात आली आहे.

मुंबई: वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोने धडक कारवाई करत तस्करीसाठी आणलेली हरणाची शिंगे जप्त केली. या प्रकरणी एका आरोपीची धरपकड ही करण्यात आली आहे.

वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी कुर्ला पश्चिम मध्ये ही कारवाई केली. कुर्ला येथील संसार हॉटेल जवळ हनुमान मंदिर, बेस्ट बस क्र. 313 च्या बस स्टॉपच्या पाठीमागे  सापळा लावून चितळ या प्रजातीच्या हरिण शिंगे तुकडा-1 सह ताब्यात घेतले. या प्रकरणी मोहम्मद सिराज मोहम्मद ताज शेख या आरोपीला रंगेहाथ अटक करण्यात आली. 

हेही वाचा-  लॉकडाऊन संदर्भात गृहमंत्र्यांचं अत्यंत महत्त्वाचं ट्विट, काय दिली आहे माहिती वाचा

सदर आरोपीला कुर्ला येथील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता सदर आरोपीला 24 तारखेपर्यंत वनकोठडी मिळाली. सदर गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद सिराज मोहम्मद ताज शेख, बग-46 वर्ष, धंदा- इस्टेट एजंट, रा. फितवाला कम्पाउंड कुर्ला (प) याचेवर वन्यजीव गुन्हा WL-02/2021  नोंदविण्यात आला आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या कारवाईत उपवनसंरक्षक वन्यजीव, ठाणे भानुदास पिंगळे आणि सहाय्यक वनसंरक्षक वन्यजीव, फणसाड नंदकिशोर कुप्ते तसेच क्षेत्रिय उपनिदेशक पश्चिम क्षेत्र वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो, बेलापूर, नवी मुंबई यांचे मार्गदर्शनानुसार वनपरिक्षेत्र वन्यजीव, मुंबई स्थित ठाणे वन्यजीव अपराध नियत्रंण बेलापूर,नवी मुंबईचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते.

----------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Bureau of Wildlife Crime Control seized deer antlers for smuggling mumbai kurla


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bureau of Wildlife Crime Control seized deer antlers for smuggling mumbai kurla