बाप कुठं मेला ज्यांना माहित नाही त्यांच्याकडे नागरिकत्वाचे कागदपत्रं मागताय? - प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

CAA आणि NRC विरोधात मुंबई प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाने धरणं आंदोलन सुरू केलंय. प्रकाश आंबेडकरही या आंदोलनात सहभागी झालेत.  पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवर प्रकाश आंबेडकर यांनी हल्लाबोल केलाय.

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी देशभरात लागू करणार नाही, असं पंतप्रधान सभेत म्हणाले. मग गृहमंत्री अमित शहा लोकसभेत एनसीआर लागू करणार असल्याची घोषणा कशी करतात? असा खडा सवाल आंबेडकरांनी विचारलाय. भाजपा आणि संघाचं राजकारण खोटारडेपणावर चालत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

CAA आणि NRC विरोधात मुंबई प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाने धरणं आंदोलन सुरू केलंय. प्रकाश आंबेडकरही या आंदोलनात सहभागी झालेत.  पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवर प्रकाश आंबेडकर यांनी हल्लाबोल केलाय.

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी देशभरात लागू करणार नाही, असं पंतप्रधान सभेत म्हणाले. मग गृहमंत्री अमित शहा लोकसभेत एनसीआर लागू करणार असल्याची घोषणा कशी करतात? असा खडा सवाल आंबेडकरांनी विचारलाय. भाजपा आणि संघाचं राजकारण खोटारडेपणावर चालत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

हे वाचलं का ? : पुतीन यांच्या जिवाला धोका, ट्रम्प होणार बहिरे; बाबा वन्गाची भारताबाबत भविष्यवाणी काय?

काय म्हणालेत प्रकाश आंबेडकर : 

 • RSS आणि  भाजप सरकार देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करतेय. 
 • पंतप्रधान म्हणतात आम्ही CAA ची जाहीर वाच्यता केलेली नाही, संसदेत त्याची चर्चा झाली नाही. 
 • पंतप्रधान असं म्हणत असतील तर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी हे लागू करू हे विधान कसे केले.
 • मी पंतप्रधानांना विचारतो, तुम्ही अमित शाह यांचा राजीनामा मागणार का ? त्यांचं खातं बदलणार का? तुम्ही तसं काहीच का केलं नाही.  
 • सत्तेत येण्यासाठी 15 लाखांचं विधान केलं होतं, आपण खोटारडे शिवाय दुसरं काहीच नाही
 • हा कायदा मुसलमानांच्या विरोधात आहे का?  तर १०० टक्के आहे. हा कायदा ४० टक्के हिंदूंच्या विरोधात देखील आहे. 
 • १८५७ मध्ये अनेकांना गुन्हेगार ठरवण्यात आलं आणि कायदा झाल्या पासून नेहरूंनी 75 वर्षांपेक्षा जास्त वेळ   त्यांना डिटेंशन कॅम्प मध्ये राहिलेत. 
 • काही  जण कॅम्पमध्ये जन्माला  आलेत आणी काही तिथेच मेली 
 • महाराष्ट्रात १६ टक्के  नागरिकांकडे कोणताही रेकॉर्ड नाही 
 • आजही महाराष्ट्रात फिरताना अनेकांचे संसार गाढव किंवा घोड्यावर दिसतात 
 • महाराष्ट्रात आज किती जणांकडे कागदपत्र कुठे आहेत, हा RSS भाजपचा डाव आहे. त्यांना त्याचं राज्य कायम ठेवायचंय  
 • आपलं राज्य वाचवण्यासाठी जो जो त्यांना विरोध करेल त्यांना त्यांचं नागरिकत्त्व काढून घ्यायचं आहे 
 • हा खेळ खंडोबा जाणीवपूर्वक सुरु आहे 
 • या सर्व परिस्थितीला आपण संघटीत रित्या उत्तर द्यायला हवं 
 • आमचे प्रश्न कुणीच मांडले नाहीत, म्हणून आम्हाला वेगळी डफली वाजवायला लागली 
 • मित्रांनो जे जे सेक्युलर म्हणतायत, फुले शाहू आंबेडकरवादी म्हणतायत अशांची जागा कुठे आहे ? 
 • आपल्याला लढता येऊ नये म्हणून यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचा बट्ट्याबोळ केलाय.  
 • आर्थिक दृष्ट्या सक्षम असू तर आपण सरकार विरोधात लढू शकतो, मात्र आपली संध्याकाळची चूल पेटत नसेल तर आपण सरकार विरोधात कसे लढणार.   
 • २८ फेब्रुवारी 2020 ला केंद्राच्या तिजोरीमध्ये या देशातील कमीत कमी सरकार चालवण्यासाठी निधी लागतो. तो जमा होणार आहे का?  प्रकाश आंबेडकर यांचा मोदींना सवाल
 • हिम्मत असेल तर मला अरेस्ट करून दाखवा 
 • ज्यांच्या मनात भीती आहे त्यांना माझं आवाहन, या देशातील खरे राजे आपण आहोत 
 • पाच वर्षांसाठी आपण यांना निवडून देतो, पाच वर्षांनी यांना धोबीपछाड देण्याशिवाय राहणार नाही  
 • बाप कुठं मेला, हे ज्या समूहाला माहीत नाही, त्यांच्याकडं तुम्ही नागरिकत्वाचे कागदपत्रं मागताय ? 
 • अर्थव्यवस्थेसाठी आपण लढणार आहोत 
 • कुठुंब आणि देशाला आर्थिक व्यवस्थेपासून वाचवायचं आहे 
 • मुंबईत दोन ठिकाणी डिटेंशन कॅम्प सरू करण्यात आलेत
 • एक खारघरमध्ये आहे तिथे जे आफ्रिकन लोकं ड्रग्समध्ये डील करतात त्यांना ठेवलं गेलंय 
 • खारघरचा कॅम्प २ लाख लोकं राहतील एवढा मोठा बांधला आहे 
 • दुसरा कॅम्प नेरूळला रेल्वे स्टेशनच्या बाजूने गेलात तर एक पडकी इमारत दिसेल, त्याच्या बाजूला २ मजली इमारत आहे. दाखवायला हि इमारत समाज कल्याणची इमारत आहे. 
 • मात्र सदर इमारत डिटेंशन कॅम्पची आहे  
 • फडणवीस म्हणालेत आम्ही डिटेंशन कॅम्पची आम्ही जागा पहिली, नुसती पहिली नाही त्यांनी बांधून देखील ठेवलीये 
 • आम्ही सरकारला विचारतो आता कॅम्पतर आले, मग ते कॅम्प का बांधलेत ते सांगा 
 • तुम्हाला CAA आणि NRC राबवायंचं आहे म्हणून तुम्ही कॅम्प बांधत आहात 
 • ज्या दिवशी आपण रस्त्यावर उतरलो त्या दिवशी आपण या यांच्यावर पाणी टाकायला सुरवात केली आता यांना  बुडवायचं आहे. 
 • जे NRC आणि CAA विरोधात त्यांना आमचा पाठींबा 
 • काही जाण 3 दगडावर हात ठेऊन चालतात 
 • एवढं सगळं रान पेटलं असताना सावरकरांना कशाला मध्ये आणणातात 
 • NRC फक्त मुसलमानाच्या विरोधात नाही तो हिंदूंच्या देखील विरोधात. 

हेही वाचा : घर नंबर-506 आणि चॉकलेटी रंगाची पिशवी

प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणानंतर मुंबईतील धरणं आंदोल आंदोलन संपल्याचं त्यांनी आंबेडकर यांनी जाहीर केलं.  

CAA and NRC is not only against muslims but also against forty percent hindus says ambedkar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CAA and NRC is not only against muslims but also against forty percent hindus says ambedkar