सभापतिपदासाठी भाजपचा डाव : राम शिंदेंच्या नावाची चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ram Shinde

सभापतिपदासाठी भाजपचा डाव : राम शिंदेंच्या नावाची चर्चा

मुंबई : राज्यातील सत्तांतर, मंत्रिमंडळ विस्तार आणि आता खातेवाटपानंतर विधानपरिषदेचे सभापतिपद ताब्यात घेण्याचा डाव टाकण्यास भाजपने सुरवात केली आहे. सभापती निवडीपूर्वी राज्यपाल कोट्यातील १२ आमदार नियुक्त व्हावेत, यासाठीही भाजपने जोरदार प्रयत्न चालविले आहेत. सभापतिपदासाठी भाजपकडून आमदार राम शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.

विधानपरिषदेत वर्चस्वासाठी सभागृहाच्या सभापतिपदावर आपल्या पक्षाचा नेता बसावा, असा भाजपचा मनसुबा आहे. सभागृहाच्या कामकाजावरील पकड घट्ट करण्यासाठी सभापतिपद मिळविण्याची भाजपची रणनीती आहे. त्याकरिता शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या विधानपरिषदेत भाजपकडे २४, तर शिवसेनेकडे ११ आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे प्रत्येकी १० जागा तर १६ जागा रिक्त आहेत. यामध्ये राज्यपाल नियुक्त १२ जागांचाही समावेश आहे. विधान परिषदेचा सभापती निवडण्यापूर्वी या जागांची नियुक्ती झाल्यास भाजपचे संख्याबळ महाविकास आघाडीपेक्षा अधिक होईल आणि पक्षाला विधानपरिषदेतही बहुमत सिद्ध करता येईल. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात सर्वाधिक मलाईदार खाती भाजपने स्वत: जवळ ठेवली आहेत. आता भाजपच्या विधानपरिषदेच्या सभापतिपदासाठीही हालचाली आहेत. मंत्रिमंडळात संधी न मिळालेले शिंदे यांची सभापतिपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.

Web Title: Cabinet Expansion Chairmanship Legislative Council Ram Shinde Speaker Mla Bjp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..